आव्हाडांनी चांगली जागा दिलीय, ती विकू नका! शरद पवारांचं आवाहन

शरद पवार यांनी बीडीडी चाळीत अनेक महान लोकांनी वास्तव्य केल्याचे सांगत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
Redevelopment work of BDD chawl starts in presence of Sharad Pawar
Redevelopment work of BDD chawl starts in presence of Sharad Pawar

मुंबई : मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची सुरूवात रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शरद पवार यांनी स्थानिकांना मराठीपण जपण्याचे आवाहन केले. या जागेवर चाळी जाऊन टॉवर उभे राहतील. पण यामध्ये मराठी टिकली पाहिजे, ती जागा विकू नका, असे पवार म्हणाले. (Redevelopment work of BDD chawl starts in presence of Sharad Pawar)

शरद पवार यांनी बीडीडी चाळीत अनेक महान लोकांनी वास्तव्य केल्याचे सांगत जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले, आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी  ऐतिहासिक दिवस आहे. गिरगाव म्हणून ओळखला जाणारा हा परिसर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, कॉम्रेड डांगे यांच्यासह अनेकांचे या चाळीत वास्तव्य होतं. हा परिसर महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे.

चाळींच्या पूनर्विकासाला सुरूवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत पवार म्हणाले, या चाळी आज-उद्या जातील. तिथे टॉवर उभे राहतील. पण यातील कष्ठकारी माणूस जाऊ देऊ नका. ऐकेकाळी गिरणीचा भोंगा वाजल्यानंतर बाहेर पडणारा कामगार आता दिसत नाही. जितेंद्र आव्हाड ठाण़्याला गेले असले तरी ते चांगली जागा देत आहे. ती विकू नका. या ठिकाणी मराठी आवाज राहिला पाहिजे, तो टिकला पाहिजे. देशाला मोठं करण्यासाठी महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, असं आवाहनही पवार यांनी केलं. या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांची चाळींविषयी कृतज्ञता

आयुष्यात काही क्षण अनपेक्षित येतात. मी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. पण ती जबाबदारी स्वीकारावी लागली. लहानपणापासून शिवसैनिकांच्या घरी येणंजाणं होत असे. चांगल्या कामाला माझ्या हस्ते सुरूवात हे मुख्यमंत्री म्हणून हे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. ऋण आम्ही सगळ्यांनी तुमचं व्यक्त केलं पाहिजे. या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत नाही. चाळींचे टॉवर होतील पण चाळींनी जे टॉवर दिले त्यांची उंची आपण मोजू शकत नाही. माझ्या जन्माच्या आधीपासूनचा चाळींचा इतिहास आहे. या चाळींनी अनेक महान लोकं दिली, असे ठाकरे म्हणाले. 

उद्धव लक्षात ठेव प्रत्येक मैदानाची एक भाषा असते, असं बाळासाहेब सांगायचे. जांबोरी मैदानात चळवळी, क्रांतीच्या ठिणग्या जन्माला आल्या आहेत. हे हेच मैदानात रोमहर्षक क्षण अनुभवतोय. चाळीचे टॅावर जरूर होतील. पण चाळीची संस्कृती तुटू देऊ नका. बीडीडी चाळीमध्ये जेव्हा यायचो तेव्हा चाळ म्हणजे एक कुटूंब असतं. या चाळीने अनेक हुतात्मे दिले, त्याची आठवण ठेवा. हक्काची घरं झाल्यानंतर कोणत्याही मोहाला बळी न पडता मराठीपणाला धक्का लावू देऊ नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com