थप्पड से डर नहीं लगता...अशी एक झापड देऊ की पुन्हा कधी उठणार नाही! मुख्यमंत्री संतापले

भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे.
CM Uddhav Thackeray criticize BJP Leaders over contravercial comments
CM Uddhav Thackeray criticize BJP Leaders over contravercial comments

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सणसणीत इशारा दिला आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवन फोडण्याची धमकी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपच्या इतर नेत्यांकडूनही शिवसेना व मुख्यमंत्र्यांवर सातत्याने टीका केली जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे रविवारी चांगलेच भडकले. थप्पड से डर नहीं लगता, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही इशारा दिला. (CM Uddhav Thackeray criticize BJP Leaders over contravercial comments)

मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांनी आपल्या भाषणात डबल सीट चित्रपटाचा उल्लेख केला होता. त्याअनुषंगाने बोलताना ठाकरे यांनी आपलं ट्रिपल सीट सरकार असल्याचं सांगितलं. 

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, हे मी मुद्दाम बोलतोय. आतापर्यंत टीका ऐकण्याची खूप सवय झाली आहे. कुणी कौतुक केली की भिती वाटते. एका चित्रपटाचा डायलॅाग आहे, थप्पड से डर नहीं लगता. अशा थपडा खालेल्याही आहेत आणि त्यापेक्षा दामदुपटीने दिलेल्याही आहेत. यापुढेही देऊ. आम्हाला कोणी थपडा देण्याची धमकी देऊ नये. अशी एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही. तो शिवसैनिकांच्या रक्तातील गुण आहे. हा लढवय्याचा गुण, हा आवाज उठलाच पाहिजे. हा आवाज उठला नाही तर या आवाजाला काही किंमत नाही. 

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

भाजपची ताकद काय आहे हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आपण दाखवून दिले. कारण, त्यावेळी जी भाजप होती, भाजपला मानणारा कार्यकर्ता विचाराचा जो मतदार होता. तो मतदार आज देखील आपल्या सोबत आहे आणि आता तर सोने पे सुहागा हुआ है…कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे व राणे कुटुंबीयांना मानणारा देखील खूप मोठास्वाभिमानीचा गट भाजपमध्ये आला आहे. त्यामुळे भाजपची ताकद ही निश्चितच वाढली आहे. नितेशची पुढच्या वेळी आपण थोडे कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच जास्त येतात. फक्त त्यांना सांगायचे की वर्दी घालून पाठवू नका, त्यामुळे आपल्या हॉलमध्ये बसायला उपयोग होईल. कारण एवढी भीती आमची की त्यांना असे वाटते की हे माहीममध्ये आले, म्हणजे सेना भवन फोडणारच, काही घाबरू नका वेळ आली तर ते देखील करू'', असे लाड म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांची चाळींविषयी कृतज्ञता

आयुष्यात काही क्षण अनपेक्षित येतात. मी मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. पण ती जबाबदारी स्वीकारावी लागली. लहानपणापासून शिवसैनिकांच्या घरी येणंजाणं होत असे. चांगल्या कामाला माझ्या हस्ते सुरूवात हे मुख्यमंत्री म्हणून हे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. ऋण आम्ही सगळ्यांनी तुमचं व्यक्त केलं पाहिजे. या ऋणातून कधी मुक्त होऊ शकत नाही. चाळींचे टॉवर होतील पण चाळींनी जे टॉवर दिले त्यांची उंची आपण मोजू शकत नाही. माझ्या जन्माच्या आधीपासूनचा चाळींचा इतिहास आहे. या चाळींनी अनेक महान लोकं दिली, असे ठाकरे म्हणाले. 

उद्धव लक्षात ठेव प्रत्येक मैदानाची एक भाषा असते, असं बाळासाहेब सांगायचे. जांबोरी मैदानात चळवळी, क्रांतीच्या ठिणग्या जन्माला आल्या आहेत. हे हेच मैदानात रोमहर्षक क्षण अनुभवतोय. चाळीचे टॅावर जरूर होतील. पण चाळीची संस्कृती तुटू देऊ नका. बीडीडी चाळीमध्ये जेव्हा यायचो तेव्हा चाळ म्हणजे एक कुटूंब असतं. या चाळीने अनेक हुतात्मे दिले, त्याची आठवण ठेवा. हक्काची घरं झाल्यानंतर कोणत्याही मोहाला बळी न पडता मराठीपणाला धक्का लावू देऊ नका, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com