डॉक्टरचा झोपेच्या 30 गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न अन् लगेच ट्विटही!

वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
one rupee clinic doctor rahul ghule attempted suicide
one rupee clinic doctor rahul ghule attempted suicide

मुंबई : वन रुपी क्लिनिकचे (One Rupee Clinic) संस्थापक डॉ. राहुल घुले (Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. घुले यांनी झोपेच्या ३० गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःच ट्विटरवर ही माहिती दिली असून, यामुळे खळबळ उडाली आहे. 

डॉ. घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. फक्त एक रुपयात ते रुग्णांवर उपचार करत असल्याने त्यांचा हा उपक्रम अतिशय लोकप्रिय ठरला होता. मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकापासून त्यांनी या क्लिनिकची सुरुवात केली होती. ही क्लिनिक आता अनेक स्थानकांनजीक उपलब्ध आहेत. कोरोना संकट काळातही वन रुपी क्लिनिकनेही मोठे कार्य केले होते. कोव्हिड केअर सेंटर उभे करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते. 

राजकीय दबावाखाली हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे डॉ. घुले यांनी म्हटले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून राहुल घुलेंनी राजकीय एजंट्सपासून जिवाला धोका असल्याचे म्हटले होते. याबाबत त्यांनी अनेक वेळा ट्विटही केली होती. यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. 

काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून दूर जाण्याची वेळ आली आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. त्यांनी 22 जूनला रात्री राजकीय दबावाचा दाखला देत आणि पैशांच्या व्यवहारात सामान्य नागरिकाला होत असलेल्या त्रासातून आत्महत्येसारखी वेळ आली आहे, असे सांगत आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com