indian government holds talk with taliban represntatives in doha
indian government holds talk with taliban represntatives in doha

मोदी सरकार थेट तालिबानच्या संपर्कात; पडद्यामागील सूत्रधार अजित दोवाल

केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी तालिबानच्या प्रतिनिधींची गुप्त भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली :  भारत सरकारच्या (India) प्रतिनिधींनी तालिबानच्या (Taliban) प्रतिनिधींची गुप्त भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कतारमधील दोहा (Doha) येथे ही चर्चा झाली होती. कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विशेष प्रतिनिधीने हा गौप्यस्फोट केला. अफगाणिस्तान (Afganistan) संदर्भातील या चर्चेचे सूत्रधार अजित दोवाल (Ajit Doval) हे असल्याचे समजते. 

भारताच्या अधिकाऱ्यांनी तालिबानशी चर्चा करण्यासाठी कतारला गुपचूप भेट दिली. मागील काही दिवसांपासून केंद्र सरकार थेट तालिबानच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. याला आता कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी नुकतेच दोन वेळा दोहा येथे थांबले होते. यानंतर तालिबानशी भारताने चर्चा केल्याची बाब समोर आली आहे. 

देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या सल्ल्यानेच भारताचे प्रतिनिधी तालिबानच्या नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. तालिबानवर सध्या कोणतीही बंधने नसल्याने भारताने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे. सध्या भारत अफगाणिस्तान सरकारशी वाटाघाटी करत असला तरीसुद्धा परिस्थिती बदलली तर तालिबानशी वाटाघाटी करण्याचा पर्यायही भारताने खुला ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

तालिबानकडून लक्ष्य करून घडवून आणल्या जाणाऱ्या हत्या आणि प्रदेश बळकावण्याच्या घटना वाढल्याने अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी अफगाणिस्तानच्या नव्या राजकीय उभारणीमध्ये तालिबानचे महत्त्व आहे. हे लक्षात घेऊन भारताने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानातील नव्या राजकीय रचनेमध्ये तालिबानची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी या आधीही तालिबानशी चर्चा केली होती, अशी माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तानमध्ये भविष्यात तालिबानचे महत्त्व आणखी वाढणार आहे. 

मागील काही दिवसांमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दोन वेळा कतारचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी कतारच्या नेतृत्वाबरोबरच अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली. अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेत कतारचे नेतृत्व सक्रिय असल्याने भारताने त्यांच्याशी चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. कतारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतही भारताने चर्चा केल्याचे समजते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com