Jayant Patil On Death Threat : शरद पवारांना आलेल्या धमकीवर जयंत पाटील म्हणाले, 'हे चाळे कोण करतंय ते सगळ्यांना..'

Jayant Patil On Sharad Pawar Death Threat : दंगलींचा फायदा कुणाला होतो, हे साऱ्यांना कळतं..
Jayant Patil On Death Threat :
Jayant Patil On Death Threat :Sarkarnama

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे राज्यातल्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ पिंपळकर (Sourabh Pimalkar) नावाच्या एका ट्विटर अकाऊंटवर ही धमकी देण्यात आलेली आहे. (Jayant Patil On Sharad Pawar Death Threat)

पवारांपोठोपाठ ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत यांना देखील जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. यामुळे विरोधकांनी उपमुख्य़मंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली जात होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Jayant Patil On Death Threat :
घुसखोरी करणाऱ्या कन्नडिगांना महाराष्ट्र सरकारचाच छुपा पाठिंबा ; Sanjay Raut Allegation

जयंत पाटील म्हणाले पवारांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाले, "धमकी येणे ही फार गंभीर बाब आहे. या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे. याप्रकरणी तातडीने चौकशी व्हायला हवी. समाज माध्यनांवर आलेली धमकी आहे, म्हणून याकडे दुर्लक्ष होता कामा नये. अशा प्रकारचे विचार करणाऱ्या लोकांवर कठोरतली कठोर कारवाई करावी.शरद पवार यांना कहीही झालं, तर याला सर्वस्वी जबाबदार गृह खातंच जबाबदार असेल, असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil On Death Threat :
BJP Yavatmal-Washim Lok Sabha: जिल्हाध्यक्षांवर दिली यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी !

जयंत पाटील पुढे म्हणाले, तो धमकी देणारा भाजपाचा कार्यकर्ता आहे, असं दिसतंय. ट्विटरवर अशा प्रकारे लिहणाऱ्यांना काही लोक फॉलो करतात. यामुळे यांना प्रोत्साहन मिळतं. अशा प्रवृत्ती वाढीस लावून, राजकारण करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये आणि एकूण देशातच सुरू आहे. परंतु आपला महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत सुजाण आहे, त्यामुळे असे चाळे कोण करतंय, हे राज्याला समजंतय, असे ते सूचकपणे म्हंटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com