Eknath Shinde News: शिंदेंना बालेकिल्ल्यातच रोखण्याचा भाजपाचा डाव? श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघात हालचाली वाढल्या

Kalyan Lok Sabha Constituency : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर हे 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा कल्याण लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Kalyan Dombivli News : भाजपाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) हे 14 फेब्रुवारीला दुसऱ्यांदा कल्याण (Kalyan Dombivli) लोकसभा मतदार संघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याविषयी माहिती भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी रविवारी डोंबिवलीमध्ये दिली.

14 फेब्रुवारीला दिवसभर केंद्रीय मंत्री ठाकुर हे कल्याण लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात ठाकूर यांनी या मतदार संघाचा दौरा केला होता. त्यावेळी विकास कामांवरुन ठाकूर यांनी पालिका प्रशासन अधिकाऱ्यांना देखील फैलावर घेतले होते. पक्ष बांधणीसाठी भाजपचे (BJP) मंत्री हे लोकसभा मतदार संघाचे दौरे करत आहेत.

Eknath Shinde News
Eknath Shinde News : कट्टर समर्थकांना फोडत मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाडांना दिला हा इशारा

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. ठाकुर यांच्या दौऱ्याने कल्याण लोकसभा मतदार संघावर भाजपा दावा करणार का हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. ठाकुर यांच्या दुसऱ्या दौऱ्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. याविषयी केळकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी प्रभारी म्हणून या मतदार संघाचे काम पहात आहे.

संघटना मजबूत करणे आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारीत राहणे त्या अनुषंगाने हा दौरा असून शतप्रतिषत सर्व लोकसभा मतदार संघात आमची तयारी झाली पाहीजे. त्याच दृष्टीने हा मतदार संघ देखील आहे. आम्हाला वरिष्टांकडून आदेश येतील त्या पद्धतीने काम करत आहोत. लोकसभा मतदार संघात आमच्या मित्रपक्षाचे खासदार असले तरी तेथे आम्ही आमचे काम सोडलेले नाही. पक्षाने आदेश दिल्यास त्या पद्धतीने कल्याण लोकसभा मतदार संघातही काम करण्यात येईल असे सुतोवाच त्यांनी केले. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

Eknath Shinde News
Rupali Chakankar News: ''...म्हणूनच माझ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा!''; रुपाली चाकणकरांचं मोठं विधान

यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंच्या मतदार संघातच भाजप तयारी करत असल्यामुळे शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे मिशन ४५ आहे. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांचीही धाकधूक वाढली आहे. त्यातच श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघात भाजपच्या हालचाली वाढल्यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com