Satyajeet Tambe Latest News : सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज; नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

Satyajeet Tambe Latest News : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
Satyajeet Tambe, nana potola
Satyajeet Tambe, nana potolaSarkarnama

Satyajeet Tambe Latest News : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. त्या संदर्भात पटोले म्हणाले, नेकमके काय घडले याची माहिती मला घ्यावी लागेल. मी आताच बातमी बघीतली, या सगळ्या गोष्टी आल्यानंतर स्पष्टीकरण देऊ, माझ्याशी कोणतेही बोलन झाल नाही. माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

Satyajeet Tambe, nana potola
Graduate Constituency Election : पक्षाने सांगितलं तर सत्यजीत तांबेंना पाठिंबा देऊ : विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं!

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे यांनी सांगितले होते की सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितला तर देऊ, यावरीही पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपचे लोक काही बोलू शकतात. आता तांबे अपक्ष आहेत, त्यांनी काय करावे हे त्यांनी ठरवावे. ही घटना झाली ती फार काही झाली नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

आमचे जे उमेदवार डॉ. सुधीर तांबे हो त्यांच्याबाबत काय झाले हे महत्त्वाचे आहे. आमचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात हे त्यांच्या पातळीवर काय झाले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असेही नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याची घोषणा केली आहे. नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवाराबाबत अर्ज भरण्यापर्यंत गुपीत कायम राहिले होते. कॉंग्रेसचे सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची ऑफर असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे ते भाजपचे उमेदवार असतील काय? याबाबत चर्चा सुरू होती.

त्यातच कॉंग्रेसतर्फे सुधीर तांबे यांची अधिकृत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी जाहिर केली. त्यामुळे ते कॉंगेसचे उमेदवार असतील असे जाहिर झाले. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुधीर तांबे व सत्यजीत तांबे सोबत गेले. मात्र डॉ. सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. सत्यजीत तांबे यांनी दोन अर्ज दाखल केले. त्यात एक कॉंग्रेसतर्फे तर एक अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावाचा पक्षाचा एबी फॉर्म नसल्याचे सागंण्यात सांगण्यात आले आहे.

Satyajeet Tambe, nana potola
Satyajeet Tambe Latest News : 'सरकारनामा'ची बातमी खरी ठरली; सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज : भाजप पाठिंबा देणार?

आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचे सत्यजीत तांबे यांनी घोषित केले. तांत्रीक कारणामुळे आपला पक्षाचा एबी फॉर्म आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाठींब्यासाठी आपण भाजपसह सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत आपल्याला भाजपच्या (BJP) कोणत्याही नेत्यांची भेट झाली नाही. मात्र, आता आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांनी आपल्याला पाठींबा द्यावा असे सांगणार आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com