मुंबई पोलिसांचा दणका..राज कुंद्राच्या आर्थिक नाड्या आवळल्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आतात्याच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या आहेत.
mumbai police seize bank accounts related to raj kundra
mumbai police seize bank accounts related to raj kundra

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी (Mumabai Police) अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती करुन त्यांचे वितरण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी कुंद्रा याच्या घरावर आज छापा मारला. यात एका सर्व्हरसह 70 पॉर्न फिल्म सापडल्या आहेत. याचबरोबर त्याच्या आर्थिक नाड्या आवळण्यात आल्या असून, त्याच्याशी निगडित बँक खाती गोठवण्यात आली आहेत. 

कुंद्रा याच्या घरावर पोलिसांनी आज छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी एक सर्व्हर सापडला आहे. याचबरोबर कुंद्रा याचा खासगी सहायक उमेश कामतने बनवलेल्या 70 पॉर्न फिल्मही सापडल्या आहेत. फॉरेन्सिक अॅनालिसिससाठी हे सर्व्हर पाठवण्यात आले आहे. या सर्व्हरचा वापर ब्रिटनमधील किनरीन कंपनीत अपलोड करण्यासाठी होत होता का, याची पोलीस तपासणी करीत आहेत. याचबरोबर कुंद्राशी निगडित बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यात 7 कोटी 21 लाख रुपये आहेत. कुंद्रा याला हॉटहिट या अॅपच्या माध्यमातून महिन्याला 9.65 लाख रुपये मिळत होते, असे सूत्रांनी सांगितले.

कुंद्रा याच्यानंतर नेरुळमधून रायन थार्प याला अटक करण्यात आली आहे. कुंद्राने एका कंपनीच्या माध्यमातून 30 ते 40 अॅप्सची निर्मिती केलेली आहे. या कंपन्यांवर काही दिवस तो स्वतः संचालक राहायचा आणि नंतर राजीनामा देऊन विश्वासातील व्यक्तीला तिथे नेमायचा.  त्याने ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या शेकडो अश्लील व्हिडिओंचा डेटा मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणात आणखी 2 मॉडेल गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. कुंद्रा याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

चित्रपटाच्या शूटिंगच्या नावाखाली मढ बेटावरील खासगी बंगल्यांमध्ये वेश्याव्यवसाय आणि पॉर्न व्हिडीओचे शूटिंग होत असल्याची माहिती पोलिसांना फेब्रुवारीमध्ये मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यावेळी या बंगल्यांवर छापे टाकले होते. तरुण मुलींना चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून काही टोळ्या अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावत होत्या. या छाप्यादरम्यान पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली होती. 

त्यावेळी छाप्यात पोलिसांनी उमेश कामत, यास्मीन बेग खान, प्रतिभा नलावडे, मोनू गोपालदास जोशी, भानुसूर्यम ठाकूर आणि मोहम्मद आसिफ यांना अटक केली होती. त्यात पुढे गहना वशिष्ठ आणि सागरिका शोना सुमन यांनाही अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी 2021 मध्ये घडलेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर या संपूर्ण गुन्ह्यामागे मुख्य आरोपी उद्योगपती राज कुंद्रा असल्याचे समोर आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com