Rahul Narwekar Delhi Tour: राहुल नार्वेकर दिल्लीला का गेले? संजय शिरसाटांनी सांगितले नेमके कारण...

MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणात वेगवान घडामोडी घडत आहेत.
Rahul Narwekar, Sanjay Shirsat News
Rahul Narwekar, Sanjay Shirsat NewsSarkarnama

Shiv Sena MLA Disqualification Case: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसेना (Shivsena) आमदारांच्या अपात्रता प्रकरणात वेगवान घडामोडी घडत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. नार्वेकर दिल्लीला गेल्यामुळे या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी नार्वेकरांच्या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण सांगितले आहे.

विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर सुनावणी करावी, यासाठी ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी पार पडली. न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्यात या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन आठवड्यांत काय कारवाई केली, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग आला आहे.

Rahul Narwekar, Sanjay Shirsat News
Rahul Narwekar's Delhi Tour : दिल्लीला तातडीने जाण्याचे कारण राहुल नार्वेकरांनीच सांगितले…

यासंदर्भात संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, नार्वेकर हे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. आमचे दिल्लीतील वकील जे मार्गदर्शन करतील, त्यानुसार या कारवाई केली जाईल. यापूर्वी त्यांनी दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. मात्र, आता घाई जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे आम्ही पालन करू, जे काही आदेश आम्हाला देण्यात येतील किंवा जी काही भूमिका आम्हाला मांडायची असेल ती आम्ही योग्य पद्धतीने मांडू, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिल्ली दौऱ्यासंदर्भात नार्वेकर म्हणाले होते, दिल्लीचा हा माझा पूर्वनियोजित दौरा आहे. अनेक कार्यक्रम आणि बैठका आहेत, त्यात मला सहभागी व्हायचे आहे. तसेच केंद्र सरकारने महिला आरक्षणासारखे अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महिलांचे बळ आणि ताकद वाढविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. महिलांना सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या संधी देण्यासाठी महत्त्वाचे विधेयक केंद्र सरकारने आणले. त्याबद्दल केंद्र सरकारला मी धन्यवाद देतो. विरोधक काय चर्चा करत आहेत, यापेक्षा आज जे होत आहे, ते देशातील महिलांच्या हिताचे, असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Rahul Narwekar, Sanjay Shirsat News
Sadabhau Khot News : सदाभाऊंना राग अनावर; मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडीसह शिंदे सरकारवरही बरसले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com