Prakash Ambedkar News : '' महाविकास आघाडी एकत्र राहणार नाही...''; आंबेडकरांनी सांगितलं 'हे' कारण

Mahavikas Aaghadi News : ''राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये!''
Prakash Ambedkar Latest Marathi News
Prakash Ambedkar Latest Marathi NewsSarkarnama

Mumbai : वंचित बहुजन आघाडीनं ठाकरे गटाशी युती केली आहे. मात्र, या युतीला काही महिने उलटूनही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाचं भिजत घोंगडं आहे. पण याचवेळी आंबेडकरांनी महाविकास आघाडीबाबत खळबळजनक दावा केलं आहे. सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहील असं वाटत नाही. कुठल्या ना कुठल्या कारणानं आघाडीत भांडणं होऊन खेळखंडोबा होईल आणि यातून ते वेगळं होतील असं आंबेडकर म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुर्ला येथे परिवर्तन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत वंचितचे संस्थापक व अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी मोदी- शाह यांच्यासह महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह कठपूतलीप्रमाणे सर्वांना नाचवत आहेत. त्याचबरोबर कुणासोबत युती करायची किंवा नाही करायची याचं उत्तर देवाकडेही नाही तर मोदी, शाह यांच्याकडे आहे असाही टोला प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar)यांनी लगावला.

Prakash Ambedkar Latest Marathi News
Ajit Pawar News : ‘त्या’ प्रश्‍नावर अजित पवारांनी घेतली पत्रकारांची फिरकी, म्हणाले…

राष्ट्रवादीने आम्हाला शिकवू नये!

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)ला ईडी कारवाईवरुन टोला लगावला आहे. ईडी हा सर्वांचा बाप आहे, या बापाने दोरी खेचायला सुरुवात केली, तर राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील अनेकजण बाहेर पळायला सुरूवात करतील असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केला. आज आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत. आम्हाला शहाणपणा शिकवू नका, नाहीतर तुमच्या अनेक गोष्टी बाहेर काढाव्या लागतील असा इशाराही आंबेडकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.

...त्यासाठी तरी तुम्ही एकत्र या!

महाविकास आघाडीनं (Mahavikas Aaghadi)आम्हाला अद्याप बाहेर ठेवलं आहे. आम्हाला बाहेर ठेवले तरी तुमचा जो काही समझोता आहे, तो तरी करा असं आवाहन करत लोकसभेच्या 48 जागांचं वाटप तुम्ही कसं करणार, त्या जागावाटपासाठी तरी तुम्ही एकत्र या असा सल्लाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कुठल्यातरी युतीत आपण राहणार याबद्दल दुमत नाही, पण आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे, जे येतील त्यांच्यासोबत नाहीतर त्यांना सोडून सत्तेची लढाई लढू असा निर्धार व्यक्त केला.

Prakash Ambedkar Latest Marathi News
Satara Politics: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंना मोठा धक्का; बंधू ऋषिकांत शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश

अजित पवार काय म्हणाले?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचं आमच्या पक्षाला नियमित वेगळं मत असल्याचा प्रकर्षानं जाणवतं. मागील वेळीसुद्धा आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी यश आलं नाही. त्यांनी काय करावं, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांना म्हणालो, महाविकास आघाडीत वंचितसोबत तुमचं जमत असेल तर जमवून घ्या, आम्ही सोबत आहोत असे अजित पवार म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com