Prakash Ambedkar News: "पवारांचा कित्ता भुजबळांनी गिरवावा; आंबेडकरांनी करुन दिली ही आठवण..

Prakash Ambedkar On Chhagan Bhujbal: भुजबळ यांनी राजीनामा द्यावा
Prakash Ambedkar,  Chhagan Bhujbal
Prakash Ambedkar, Chhagan Bhujbal Sarkarnama

Prakash Ambedkar Slams Chhagan Bhujbal : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नुकतीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी सावरकरांची प्रतिमा ठेवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे काही वेळासाठी बाजूला सरकवण्यात आले. हे पुतळे कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा होते त्या जागी ठेवण्यात आले.

या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाँ. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना आवाहन केले आहे. आंबेडकर दौंड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रवादीचे नव्या दमाचे नेते आमदार रोहित पवार यांनीही सावरकर जयंती कार्यक्रमासाठी अहिल्यादेवी आणि सावित्रीबाई यांचे पुतळे हलवल्याचा मुद्दा जाहीरपणे मांडून राज्य सरकारचा निषेध केला.

आंबेडकर म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वच नेते मंडळी आणि विशेष करून माजी मंत्री छगन भुजबळ हे फुले कुटुंबियांचे आम्ही फार मोठे भक्त आहोत असे भासवितात. पण माझी त्यांना विनंती आहे की, सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविल्या प्रकरणी भुजबळ यांनी राजीनामा द्यावा," चौफुला ( ता.दौंड ) येथे महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या शिक्षक मेळाव्याच्या उदघाटनानंतर आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते.

Prakash Ambedkar,  Chhagan Bhujbal
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर ; सावित्रीबाई फुले बदनामी प्रकरणी पोलीस..

"१९९२ साली नागपूर येथे गोवारी हत्यांकाड घडले होते. या हत्यांकाडांत ११४ गोवारींची हत्या झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ तेव्हा आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाचे आमदार मखराम पवार यांनी 'ज्या सभागृहात संवेदनशीलता नाही त्या सभागृहाचा मी राजीनामा देत आहे' असे सांगत आमदारकीचा राजीनामा दिला होता," याची आठवण आंबेडकरांनी यावेळी भुजबळांना करुन दिली.

"मखराम पवार यांचा कित्ता भुजबळ यांनी गिरवावा. निषेध म्हणून भुजबळ यांनी राजीनामा द्यावा. मखराम पवार यांच्या राजीनाम्याच्या परिणाम असा झाला की, गोवारींच्या सर्व मागण्या सरकारने लगेच मान्य केल्या. महापुरूषांचा अपमान रोखायचा असेल तर कुणीतरी पुढाकार घ्यावा लागेल. छगन भुजबळ यांनी निषेध म्हणून राजीनामा द्यावा," असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar,  Chhagan Bhujbal
Sanjay Shirsat News: विनयभंग प्रकरणी शिवसेना आमदाराला क्लीन चीट ; सुषमा अंधारेंनी...

या घटनेचा निषेध म्हणून छगन भुजबळ यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. कारण महाराष्ट्र सदनात जे घडलं तो ओबीसींचा अपमान आहे. भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात. तसेच ज्या महाराष्ट्र सदनात हा प्रकार घडला ते सदन छगन भुजबळ यांनी बांधलं आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुजबळ यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आंबेडकर म्हणाले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com