Kishori Pednekar : सरडा पण लाजेल इतक्या भूमिका राज ठाकरे बदलतात ; पेडणेकरांची बोचरी टीका!

Kishori Pednekar : तुमच्या पक्षाची काय प्रतिमा आहे? ते लोकांनाही माहीती आहे, तुम्हालाही चांगलं माहीती आहे.
Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama

मुंबई : शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. "सरडा पण लाजेल एवढ्या भूमिका राज ठाकरे बदलतात," बोचरा वार पेडणेकर यांनी केला. पेडणेकर यांनी आज मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना ही टीका केली.

सरडा पण लाजेल एवढ्या भूमिका राज ठाकरे बदलतात. भोंगे वाजवले स्वत:चं राजकीय ईप्सित साध्य केलं. पुन्हा भोंगे, पुन्हा भोंगे बाहेर आले. कुठल्या गोष्टी तुम्ही लोकांपुढे ठेवत आहात? इतकं लोकांना गृहीत धरत आहात? आता लोकांनी तुम्हाला तर गृहीत धरलं आहे. आता तुम्ही यातून बाहेर नाही येऊ शकत. किती निखिलास खोटं बोलायचं. तुमच्या पक्षाची काय प्रतिमा आहे? ते लोकांनाही माहीती आहे, आणि तुम्हालाही चांगलं माहीती आहे, अशा शब्दात पेडणेकरांनी टीका केली.

Kishori Pednekar
Aditya Thackeray : शिंदे-फडणवीस आणि आदित्य ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर!

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल फेसबुक लाईव्ह वरून जनतेशी केलेल्या संवादावरही शिंदेंना सुनावले आहे. ज्या फेसबुक लाईव्ह वरून माजी मुख्यमंत्र्यांना हिणवत होते.

Kishori Pednekar
आम्ही फटाके वाजवणारच.. ; खोपकरांची भूमिका राज ठाकरे यांना मान्य आहे का?

आताचे मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह वरून काम करतायेत. हे उलट चांगलं आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा. कोव्हीडकाळात उद्धव ठाकरेंनी याचा वापर चांगला केला, पण आज फेसबुक लाईव्ह करणारे तेव्हा नाव ठेवत होते, असे पेडणेकर म्हणाले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in