भाजपच्या नेत्यांपुढे महागाईचे भोंगे लावावे लागतील का?

महागाईच्या भोंग्या विरोधात युवक राष्ट्रवादीचे चूल व लाकडे देत उपहासात्मक आंदोलन
NCP Agitation against Inflation
NCP Agitation against InflationSarkarnama

नाशिक : महागाईने (inflation) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना महागाईने होरपळून निघालेल्या जनेतेला आता मोदी (Narendra Modi) सरकार दिवसेंदिवस दणका देत आहे. या वाढत्या महागाई विरोधात प्रत्येक भाजप (BJP) नेत्याच्या घरापुढे भोंगे लावावे लागतील. यांनी गॅसचे स्वप्न दाखवून जनतेला चुलीकडे नेले आहे, असे सांगत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP) केंद्र शासनाला चूल व सरपण भेट देण्यात आले. (Centre government fail to govern Nation)

NCP Agitation against Inflation
‘मी शिवसेनेचा आमदार आहे’ हे सांगून दाखवावेच!

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरात आंदोलन करण्यात आले. मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलेंडरसह इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकडून संताप व्यक्त होत आहेत. यातच या महिन्यात गॅसच्या किंमतीत दुसऱ्यांदा दरवाढ करण्यात आली. सर्वसामान्यांना मोदी सरकार महागाईचा झटका देत आहे. त्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

NCP Agitation against Inflation
`राष्ट्रवादी`चे नेते यतींद्र यतीन पगार यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना झळा सोसाव्या लागत असून गृहिणीचे घरातील बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेक कुटुंबातील लोकांचे रोजगार बुडाले तर काहींना नोकरीपासून वंचित व्हावे लागले. या महामारीतून जीवन पूर्वपदावर येत असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस पेट्रोल, डीझेल आणि गॅसच्या किमतीत मोठ्या प्रमाणात दरवाढ होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहे. मे महिन्यातच घरगुती गॅस सिलेंडर सह व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर दोनदा वाढल्याने सर्वसामान्य जनतेचे खाणेपिणे महाग झाले आहे.

यावेळी शादाब सैय्यद, चेतन कासव, जय कोतवाल, नितीन निगळ, रामदास मेदगे, सागर बेदरकर, निलेश भंदुरे, गणेश पवार, सोनू वायकर, राहुल कमानकर, हर्षल चव्हाण, राहुल पाठक, डॉ.संदीप चव्हाण, निलेश सानप, किरण पानकर, संतोष भुजबळ, रेहान शेख, सुनिल घुगे, विक्रांत डहाळे, अक्षय पाटील, जाणू नवले, मोनू वर्मा, स्वराज्य हाके, केशव येवले, तुकाराम फासाटे, अक्षय खालकर, काशिनाथ चव्हाण, आदिल खान, नबील सय्यद, रझा शेख, निरंजन पगार आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री. खैरे म्हणाले. दोन वर्षापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या आजारातून सर्वसामान्य जनता सावरत असताना महागाई मुळे जीव देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्र सरकार इंधनाची घोडदौड थांबविण्यास असफल ठरत आहे. वाहनचालक त्रस्त होत आहे. “बहोत हो गई महंगाई की मार, अब बस कर यार !” असे बोलण्याची वेळ पंतप्रधानानी सर्वांवर आणली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in