वाई पालिका सीओंच्या चौकशीचे आदेश; उपनगराध्यक्षांच्या तक्रारीवरून निर्णय

नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे व इतर काही नगरसेवक यांचे सर्वांसोबत संगनमत करून मनमानी कारभार करणे, तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत तक्रार करून कारवाईची मागणी केली होती.
Inquire about the CO of Wai : Order to the District Collector of Urban Development Department
Inquire about the CO of Wai : Order to the District Collector of Urban Development Department

वाई : वाई पालिकेच्या कामात मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी अनियमितता, तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी स्वयंस्पष्ट चौकशी अहवाल ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत सादर करण्याची सूचना नगरविकास विभागाच्या अतिरिक्त सचिव प्रतिभा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. याबाबतचे लेखी पत्रही जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.  Inquire about the CO of Wai : Order to the District Collector of Urban Development Department
 
श्री. सावंत यांनी २९ जुलै २०२१ रोजी मुख्याधिकारी पोळ यांच्याविरुद्ध मनमानी कारभार, कर्तव्यात कसूर केल्याबाबत नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. यामध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर २८ जानेवारी २०२० रोजीच्या ठराव क्रमांक २५ मध्ये फेरफार करून, तज्ज्ञ वास्तुविशारद यांच्या सल्ल्याची फी म्हणून जादा बिल अदा करणे.

पालिका हद्दीत स्वत:चे मजुरासह ट्रॅक्टर ट्रॉली साहाय्याने जंतूनाशके वापरून फवारणी करणे यासाठी निविदा प्रणालीद्वारे लखोटा पद्धतीने मागवून, वर्तमानपत्रात ई-निविदा सूचना प्रसिद्ध केल्याबाबत नमूद करून प्रत्यक्ष तशी कार्यवाही केली नाही. तसेच पालिकेच्या सभेची मंजुरी न घेता कार्यवाही करणे, तसेच जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी न घेता कचरा संकलन घंटागाड्यांची बेकायदेशीर खरेदी करणे, न्यायालयीन प्रकरणे चालवण्यासाठी वकिलांची फी कोणतीही मंजुरी न घेता अदा करणे.

पालिकेच्या इतिवृत्तामध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करणे, ऑडिट रिपोर्ट सभागृहापुढे सादर न करणे, मंजूर निधीचा योग्य त्या कालावधीमध्ये वापर न करणे, मुख्याधिकारी हे मुख्यालयीन राहणे, तसेच अन्य प्रकरणी नगराध्यक्षा प्रतिभा शिंदे व इतर काही नगरसेवक यांचे सर्वांसोबत संगनमत करून मनमानी कारभार करणे, तसेच कर्तव्यात कसूर केल्याबाबत तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. 

या तक्रारीची दखल घेऊन नगरविकास विभागाने मुख्याधिकारी पोळ यांच्या कारभाराची चौकशी करावी आणि तसा स्पष्ट अहवाल सादर करण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्याना कळविले आहेत. याबाबत मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com