Radhakrishna Vikhe Patil News: किसान सभेचा शेतकरी प्रश्नांवरुन एल्गार; मंत्री विखे 'अॅक्शन मोड' मध्ये, सह्याद्रीवर...

Kisan Sabha : ...तर लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा
Kisan Sabha News
Kisan Sabha NewsSarkarnama

Ahmednagar News : राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं नुकसान झालं आहे. सरकारनं नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. तसेच शेतकरी, कामगार, शेतमजूर यांसारख्या घटकांच्या विविध समस्यांवरुन किसान सभा पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.

किसान सभेकडून अकोले ते महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव असलेल्या लोणी (ता. राहाता) येथील कार्यालयावर तीन दिवसांचा शेतकरी पायी ‘लाँग मार्च' काढण्यात येणार आहे.

याचवेळी महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी तातडीने शेतकरी प्रश्नांवरील मागण्यांच्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी १२.३० वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचं आमंत्रण डॉ.अजित नवले यांना देण्यात आलं आहे. या बैठकीत किसान सभेच्या चर्चांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. याचमुळे अजित नवले मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Kisan Sabha News
Bhusawal APMC : एकनाथ खडसे देणार भाजपच्या आमदार सावकारेंना शह!

शेतकऱ्यांच्या हक्कांवरुन पुन्हा एकदा किसान सभेनं एल्गार पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी लाँग मार्च’काढणार असल्याची घोषणा केली होती. आता हा लाँग मार्च अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ते महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव असलेल्या लोणी (ता. राहाता) येथील कार्यालयापर्यंत शेतकरी पायी लाँग मार्च काढणार आहे.

...तर लढा आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा

महसूल आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर अखिल भारतीय किसान सभा, सीटू, बांधकाम कामगार फेडरेशन, अखिल गुरव समाज संघटना तसेच शेतमजूर युनियन, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय, एसएफआय या समविचारी संघटनांचा मोर्चात धडकणार आहे. मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रुपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करुन लढा तीव्र केला जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभे(Kisan Sabha) नं दिला आहे.

Kisan Sabha News
Kolhapur Politics:राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक पुन्हा गुलाल उधळणार की सतेज पाटील सत्ता खेचून आणणार?आज निकाल

किसान सभेच्या मागण्या काय?

राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच मोठं नुकसान झालं आहे. सरकारनं या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्यक्षात मात्र कोठेही मदत करण्यात आली नाही. दूध, कापूस, सोयाबीन, हिरडा, तूर, हरभरा यासारख्या पिकांना रास्त भावाची हमी देण्यात यावी अशी मागणीही करण्यात येणार आहे.

पोलीस आणि वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे आणि जमिनींवरुन हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरु करण्यात आल्या आहेत. जमीन अधिग्रहणास योग्य मोबदला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना आणि निराधारांना पेंशन, सर्वांना घरकुले, कर्ज आणि वीजबिल माफी, शेतीला सिंचनासाठी धरणांचे पाणी, बांधकाम कामगारांना मेडिक्लेम द्यावा अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत यांसारख्या विविध मागण्यांचा समावेश आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com