Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Radhakrishna Vikhe Patil: ''केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता,त्यामुळे...''; भाजप नेते विखे पाटलांचा विरोधकांना इशारा

Ahmednagar Politics : ...तर त्याची गय केली जाणार नाही!

विनायक दरंदले

Nevasa News : केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता असल्याने कुणाचीच दडपशाही सहन केली जाणार नाही असा इशारा भाजप नेते व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी सोनई संस्था स्थापन झाल्यापासून एकहाती सत्ता ठेवल्याने सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी वाढली असून शेतकरी हिताचे दिवस पाहायचे असतील तर निवडणुकीतील निवड योग्य करून परिवर्तन घडवून आणावे असं मत आवाहनही मतदारांना केलं आहे.

नेवासे बाजार समिती निवडणुकीमुळे स्थानिक राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप,शिवसेना प्रणित शेतकरी विकास मंडळाच्या प्रचाराचा नारळ राधाकृष्ण विखे पाटलां(Radhakrishna Vikhe Patil) च्या हस्ते फोडण्यात आला. यावेळी आयोजित सभेत विखे पाटील बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil
Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणात मोठी अपडेट; धर्म अभ्यासकासह 'ते' 8 जण अद्यापही फरारच

Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर दंगल प्रकरणात मोठी अपडेट; धर्म अभ्यासकासह 'ते' 8 जण अद्यापही फरारचया सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे होते. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, माजी खासदार तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,शिवसेना तालुकाध्यक्ष सुरेश डिके,मनोज पारखे,भारत गुंजाळ,भगवान गंगावणे,माऊली पेचे उपस्थित होते.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी प्रास्ताविक भाषणात प्रस्थापितांच्या हुकूमशाहीमुळे नेवासे तालुक्यात लोकशाही धोक्यात आल्याचे सांगितले. यावेळी निवडणूक(Election) मैदानात असलेल्या सर्व उमेदवारांची ओळख करून देण्यात आली.

Radhakrishna Vikhe Patil
Eknath Shinde on Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची हे सांगायला पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज ? ; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

...तर त्याची गय केली जाणार नाही!

विखे-पाटील यांनी बाजार समितीमध्ये धनदांडग्यांची चलती असून शेतकऱ्यांऐवजी साठेबाजांचे हित जपले जाते.असे सांगितले. वाळू चोरीच्या रॅकेटवर धडक कारवाई केली जाईल.सहाशे रुपये प्रतिब्रासने वाळू देताना कुणी आडवे आले तर त्याची गय केली जाणार नाही. १५ जुलैपर्यंत नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने सर्व शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी केली जाईल असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com