Congress News : ज्यांनी पक्षाविरूद्ध काम केलं, त्यांच्या घरी नेतेमंडळी का जातात? रमेश बागवे बैठकीतच संतापले !

Ramesh Bagwe On Congress Group : पक्षश्रेष्टींसमोरच विचारला जाब...
Ramesh Bagave
Ramesh Bagave Sarkarnama

प्राची कुलकर्णी

Pune Congress News : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा नुकताच मुंबईत प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत काँग्रेसमधली नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. (Latest Marathi News)

पुणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे यांनी गटबाजी व पक्षप्रवेशांचा उल्लेख करत अशा गोष्टींना आवर घालण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यास समोरच त्यांनी अनेक गोष्टींचा उघडपणे जाब विचारत यापुढच्या काळात अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, असे आवाहन केले.

Ramesh Bagave
Chief Minister Relief Fund: आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज; सरकारचा 'गतिमान' निर्णय

मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सभागृहात लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचे आयोजन केले गेले होते. या बैठकीतच रमेश बागवे यांनी गटबाजीचा मुद्दा उपस्थित केला. बागवे म्हणाले, "माझी विनंती आहे, काँग्रेसमधली गटबाजी पहिल्यांदा संपली पाहिजे. सर्व नेते मंडळींनी एक झालं पाहिजे. आपली ताकद आहे, पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. आपण आता कसब्यामध्ये जे काय झालं ते पाहिलं. कार्यकर्त्यांनी कष्ट घेतलं. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोबत होती. सुदैवाने उमेदवार चांगला होता,म्हणून विजय झाला."

बागवेपुढे म्हणाले, "लोकसभेला आतापासूनच तयारी केली पाहिजे. गटबाजी थांबली पाहिजे. गटबाजी थांबली नाही नुसती चर्चा करण्यात काही अर्थ नाही. ज्यांनी पक्षाविरूद्ध काम केलं,अशांना नेतेमंडळी सोबत घेऊन बसतात. अशा वेळी प्रामाणिक कार्यकर्त्यांनी काय करायचं? ज्यांच्यामुळे पक्षाचं नुकसान झालं. दोन आपले आमदार झाले असते. थोड्या मतांनी गेलो, नाहीतर दत्ता बहिरट आणि मी. एकमेव आपली जागा कँन्टोमेंटमध्ये होती. आयत्या वेळी लोकं गेली. वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगायला समजून सांगायला हवं होतं, तुम्हाला पक्षाने काय कमी केलं बाबा? अशी खदखद बागवे यांनी व्यक्त केली.

Ramesh Bagave
CM Arvind Kejriwal हैराण, विरोधी पक्षांकडे का करतायत मदतीची याचना ? | AAP | Modi | Delhi| Sarkarnama

नगरसेवक व्हायला दहा बारा वर्षे लागतात, आमदार व्हायला पंधरा वर्षे लागतात. कार्यकर्ता घडावला अनेक वर्षे जातात. त्याला ताकद द्यायला हवी. नेत्यांनी पक्ष सोडणाऱ्यांनाच पाठीशी घातले तर पक्ष कसा पक्ष मोठा होणार, असा प्रश्‍न बागवे यांनी विचारला. अनेकजण इतरत्र वेगळे बोलतात. तुमच्याकडे येऊन वेगळे बोलतात. ज्यांनी काँग्रेसला पाडण्याचं काम केलं, भाजपसोबत गेले. त्यांना तुम्ही घेऊन बसता. कार्यकर्ते काय करणार? कुणाकडे बघणार? पक्षासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा पक्ष त्याला उमेदवारी देतो. ही जाण नेत्यांमध्ये रूजवा, वरकरणी काही करून फरक पडणार नाही? असे रमेश बागवे यांनी नेत्यांना सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com