Sujay Vikhe Patil News : नगर दक्षिणमधून काँग्रेस की राष्ट्रवादी? भाजपचे सुजय विखेंचं सूचक वक्तव्य

MVA vs BJP : आमदार निलेश लंके लोकसभा लढण्याच्या तयारीत ?
Balasaheb Thorat, Sujay Vikhe Patil
Balasaheb Thorat, Sujay Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar Political News : नगर दक्षिण लोकसभेच्या जागेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशीच लढत होत आली आहे. दरम्यान, ही जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत केली आहे. महाविकास आघाडीतील या रस्सीखेचीत भाजपचे खासदार सूजय विखे पाटलांनी सूचक वक्तव्य केले आहे.

आढावा बैठकीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी (Ahmednagar) अहमदनगर दक्षिण हा मतदारसंघ मूळ काँग्रेसचा आहे. हा मतदारसंघ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळावी. येथून ज्येष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी उमेदवारी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके तयारी करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसची बाजू घेत सूचक वक्तव्य केले.

Balasaheb Thorat, Sujay Vikhe Patil
Kirit somaiya News: 'लव्ह जिहाद' रोखण्यासाठी कडक कायदा करा; किरीट सोमय्यांची मागणी

नगर दक्षिणेचे भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी थोरातांच्या संभाव्य उमेदवारीचे स्वागत केले. ते म्हणाले, "थोरातसाहेब काँगस पक्षाचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी दिल्यास नागरिकांना आनंद होईल. त्यामुळे ही निवडणूक स्पर्धात्मक होईल." खासदार विखेंच्या या वक्तव्यांवरून मात्र जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आले आहे.

नगर दक्षिण हा मतदारसंघ भाजपकडे दहा वर्षांपासून आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ होता. त्यामुळे येथून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत अनेक टर्म दिसून आली आहे. 2014 ला भाजपचे (BJP) दिवंगत दिलीप गांधी तर 2019 मध्ये सुजय विखे यांनी येथून विजय मिळवला. 2019 ला सुजय विखे यांनी दोन लाखावर मताधिक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांना पराभूत केले.

Balasaheb Thorat, Sujay Vikhe Patil
Sharad Pawar Appreciated Nitin Gadkari : मोदी सरकारमधील कोणता मंत्री तुम्हाला आवडतो ? ; शरद पवारांनी घेतले यांचं नाव..

दरम्यान, या लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारीचे संकेत आहेत. त्यानुसार त्यांनी दोन वर्षांपासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. जनमानसात आमदार लंके यांना एक वेगळे स्थान आहे. ते राजकारणात प्रस्थापित असलेल्या विखे परिवाराला शह देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे यांनी केलेल्या काँग्रेसचे थोरात यांच्या स्वागताला वेगळी किनार असल्याची चर्चा आहे.

आमदार लंके प्रस्थापित विखे पाटलांपुढे तगडे आव्हान उभे करतील, असे कायम बोलले जात आहे. महाविकास आघाडीत (MVA) मात्र दक्षिण नगर जागेबाबत काँग्रेस आग्रही झाले आहे. या परिस्थितीत आता धोरणी राजकारणासाठी प्रसिद्ध असलेले विखे परिवाराचे तिसऱ्या पिढीतील शिलेदार खासदार सुजय विखे यांनी थोरात यांच्या उमेदवारीवर अप्रत्यक्षपणे अनुकूलता दर्शविली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in