Nitesh Rane News : ''संजय राऊत लँडमाफिया...''; उध्दव ठाकरेंवरही दंगली भडकावण्याचा राणेंचा गंभीर आरोप

Nitesh Rane Vs Sanjay Raut : ''दुसऱ्याला माफिया म्हणणाऱ्यानं आधी स्वत: कडं पाहावं...''
Nitesh Rane News,Uddhav Thackeray, Sanjay Raut
Nitesh Rane News,Uddhav Thackeray, Sanjay RautSarkarnama

Mumbai: ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारावरुन घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी मोदी आणि शाह यांचा उल्लेख 'भाषणमाफिया' असा केला. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत हा सर्वात मोठा 'लँडमाफिया' आहे असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

नितेश राणे(Nitesh Rane) यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी संजय राऊतांसह उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राणे म्हणाले, संजय राजाराम राऊत हा किती मोठा लँड माफिया आहे हे मी महाराष्ट्राला सांगतो आहे. राऊत यांची मुंबईतल्या भांडुप, विक्रोळी या भागांमध्ये आर वरून सुरु होणाऱ्या बिल्डरसोबत पार्टनरशिप आहे. त्या निमित्ताने त्यांनी किती लोकांच्या जमिनी बळकावल्या आहेत याचं उत्तर राऊत या लॅन्डमाफियानं द्यावं असं राणे म्हणाले आहेत.

Nitesh Rane News,Uddhav Thackeray, Sanjay Raut
Ramsheth Thakur Felicitated by Sharad Pawar: रयत शिक्षण संस्थेला 100 कोटींची देणगी: कोण आहेत रामशेठ ठाकूर?

तसेच अलिबागच्या किहीम या ठिकाणी असलेला प्लॉट एका मराठी कुटुंबाकडून कवडीमोल भावामध्ये दमदाटी करून घेतला. पुशिरकर नावाचं ते कुटुंब आहे. किहीम बीचवर रिसॉर्ट बांधण्याचे याचे मनसुबे आहेत. कोट्यवधींची जमीन अवघ्या १० कोटींमध्ये घेतली. दुसऱ्यांना माफिया बोलणाऱ्या संजय राऊतां(Sanjay Raut)नी ते किती मोठा लँडमाफिया आहे याचं उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिजे. तसेच दुसऱ्याला माफिया म्हणणाऱ्यानं आधी स्वत: कडं पाहावं असंही राणे यावेळी म्हणाले.

मातोश्रीवर दंगली घडवण्यासाठी ठाकरेंची बैठक...

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात विविध दंगली घडवण्यासाठी मातोश्रीवर बैठक घेतल्याचा गंभीर असताना आमदार नितेश राणेंनी केला आहे. ते म्हणाले, १३ ऑगस्ट २००४ ला मातोश्रीवर एक बैठक झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)नी सांगितलं होतं की, १९९२, ९३ च्या दंगली जशा घडल्या, तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे.

Nitesh Rane News,Uddhav Thackeray, Sanjay Raut
Akola District BJP : सावरकर प्रदेश कार्यकारिणीत, पिंगळे-थोरातांमध्ये रस्सीखेच, महानगराध्यक्षपदी अग्रवाल कायम?

यावेळी त्यांनी चर्नी रोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातले जे मुस्लीम फेरीवाले आहेत. त्यांच्यावर वस्तरा चालवत हल्ले करायचे. त्यानंतर मुंबईत दंगली घडतील. त्या भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं असं नितेश राणेंनी सांगितलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com