Sanjay Shirsat On Sanjay Raut News : राऊतांसारख्या सल्लागारांमुळेच उद्धव ठाकरेंवर ही परिस्थीती ओढावली..

Maharashtra : उद्धव ठाकरे यांच्या बाजूला संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासारखे जे दोन-चार कान चावणारे सल्लागार आहेत.
Mla Sanjay Shirsat-Sanjay Raut News
Mla Sanjay Shirsat-Sanjay Raut NewsSarkarnama

Shivsena : महाविकास आघाडी सरकार असतांना शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी होती. हे माहीत असून सुद्धा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले, काही नाही १४-१५ आमदार आहेत, त्यांना जाऊ द्या, आपल्या रस्त्यातील काटे निघून जातील. ते अपात्र ठरतील आणि आपल्याला सत्ता अबाधित राखता येईल. या अशा बिनडोक सल्लागार आणि त्यांच्या सल्ल्यांमुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर आज ही परिस्थिती ओढावली असल्याची टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत केली.

Mla Sanjay Shirsat-Sanjay Raut News
Latur Congress News : काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या निलंगा खरेदी-विक्री संघावर ६३ वर्षानंतर भाजपचे वर्चस्व..

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूला संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासारखे जे दोन-चार कान चावणारे सल्लागार आहेत, त्यांच्यामुळेच आज ही अवस्था असल्याचा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. (Shivsena) शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी सामनामधून लिहलेल्या अग्रलेखातून शरद पवार व राष्ट्रवादीवर टीका केली होती. याचे तीव्र पडसाद राष्ट्रवादीत उमटले.

स्वतः शरद पवार यांनी संजय राऊत यांना सौम्य भाषेत फटकारले. यावर (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांना विचारले असता ते म्हणाले, मुळात संजय राऊत हे इतरांच्या घरात का डोकावतात? हा खरा प्रश्न आहे. हे नसते उद्योग त्यांना कुणी सांगितले. राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी राजकीय वारस नेमायचा की नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात तुम्ही का चोंबडेपणा करता ?

राष्ट्रवादी असेल किंवा आमचा पक्ष शिवसेना असेल निर्णय घ्यायला आम्ही सक्षम आहोत ना? तुमच्या सल्ल्यांची आम्हाला गरज नाही. अशा चुकीच्या सल्ल्यांमुळेच आज उद्धव ठाकरे यांच्यावर ही परिस्थिती ओढावली आहे, असा टोला देखील शिरसाट यांनी लगावला. महाविकास आघाडी टिकू नये, यासाठीच संजय राऊत यांच्याकडून सातत्याने असे प्रकार सुरू आहेत, असा आरोप देखील शिरसाट यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com