Kirit Somaiya News: अनिल परबांचं अनधिकृत कार्यालय तोडलं,सोमय्यांच्या दाव्यानंतर ठाकरे गट आक्रमक

Mumbai News : अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती.
Anil Parab, Kirit Somaiya
Anil Parab, Kirit Somaiya Sarkarnama

Kirit Somaiya On Anil Parab : माजी मंत्री व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी असलेलं जनसंपर्क कार्यालय तोडण्यात आल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या( Kirit Somaiya) यांनी टि्वट केलं आहे. या टि्वटद्वारे त्यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परबांबाबत मोठा दावा केला आहे. सोमय्या यांनी टि्वटद्वारे परब यांचे वांद्रे येथील म्हाडा (Mhada) कॉलनीमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला असून या संदर्भातील फोटो ट्विट करत हे कार्यालय अनिल परब यांचेच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी काल केला. आज या तोडलेल्या ठिकाणाची पाहणी देखील करण्यासाठी जाणार असल्याचंही सोमय्या यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहेत. त्या पार्श्वभूमीवर या भागात शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमा झाले आहे.

Anil Parab, Kirit Somaiya
Threatening call to Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना धमकीचा कॉल

अनिल परब (Anil Parab) यांचे वांद्रे येथील कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची नोटीस दोन वेळा परब यांना दिली होती. मात्र, परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव म्हाडाने फेटाळून लावला. त्यामुळे सोमय्या यांनी पुन्हा म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

अनिल परबांच्या कार्यालयासमोरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी 12.30 पर्यंत परबांच्या घरासमोरच असलेल्या कार्यालयाच्या पाहणीसाठी दाखल होणार आहे. शिवसैनिक अनिल परबांच्या घरासमोरील परिसरात जमण्याची शक्यता आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.

Anil Parab, Kirit Somaiya
Chhagan Bhujbal; `ओबीसी`चे हक्क नाकारणाऱ्यांविरोधात एकत्रित लढा!

टि्वटमध्ये काय आहे ?

मिलिंद नार्वेकरचा बंगलो तुटला, अनिल परबचे कार्यालय तोडले. म्हाडा वांद्रे पूर्व येथील अनिल परब अनधिकृत कार्यालय तोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये दिले. ठाकरे सरकारनी ते वाचविण्याचे प्रयत्न केले होते, आत्ता पाडण्यात आले. मी आज दुपारी 12.30 वाजता त्या ठिकाणी भेट देणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com