Kirit Somaiya : लोकायुक्तांनीच सोमय्यांच्या तक्रारीची काढली हवा

Remdesivir : किरीट सोमय्यांना मोठा धक्का बसला
Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama

Remdesivir : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या खरेदीमध्ये कुठेही अनियमितता किंवा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत नाही, असा निर्णय महाराष्ट्र लोकायुक्तांनीच दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. तर या निर्णयामुळे किरीट सोमय्यांना मोठा धक्का बसला आहे.

कोरोनाच्या काळात रेमडेसिवीर इंजेक्नशच्या खरेदीमध्ये मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच याबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे सोमय्यांनी केली होती.

मात्र, आता लोकायुक्तांनी या पूर्ण प्रकरणाची चौकशी करत मुंबई महापालिकेला क्लीन चीट दिली असून सोमय्यांनी केलेले आरोप चुकीचे ठरले आहेत. त्यामुळे सोमय्यांच्या तक्रारीची थेट लोकायुक्तांनीच हवा काढली असल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे.

Kirit Somaiya
Chinchwad-Kasaba By Election News : चिंचवड राष्ट्रवादी लढणार, कसब्यावरही दावा

नेमकी प्रकरण काय?

कोरोनाच्या काळात रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्नशचा वापर मोठ्या प्रमाणात झाला होता. हेच रेमडेसिवीर इंजेक्नश खरेदी करताना मुंबई महापालिकेच्या खरेदी किंमतीत आणि इतर ठिकाणच्या रेमडेसिवीर इंजेक्नशच्या किंमतीत मोठी तफावत समोर आली होती. रेमडेसिवीर इंजेक्नश खरेदी करताना मुंबई महापालिकेने एका इंजेक्शनमागे १ हजार ५६८ रुपये मोजले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

Kirit Somaiya
Chandrashekhar Bawankule : पंकजाताई आमच्या नेत्या, त्यांना पक्षातीलच एक गट बदनाम करतोय..

त्यानंतर त्यांनी या रेमडेसिवीर खरेदीमध्ये भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोमय्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेला क्लीन चीट दिली आहे. दरम्यान, लोकायुक्तांच्या या निर्णयामुळे किरीट सोमय्यांना मोठा दणका बसला असून मुबंई महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in