Maharashtra Politics : पंतप्रधान मोदींसाठी आता फासाचा दोर पाठवावा का?; संजय राऊतांचं आक्षेपार्ह विधान !

Sanjay Raut on Shinde Group : ''नोटबंदीमुळे 50 खोकेवाले हैराण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे 2 हजारांच्या नोटा बदलून देण्याचा लावत आहेत तगादा....''
Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut, Narendra Modi Sarkarnama

Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर मला फक्त 50 दिवसांचा वेळ द्या. सर्व ठीक होईल. त्यानंतरही जनतेला त्रास झाल्यास, माझी काही चूक निघल्यास मला भरचौकात फाशी द्या असं विधान केलं होतं. यावर नोटाबंदीचा कोणताही फायदा झालेला नाही. मोदी स्वत: म्हणाले होते, काही चुकीचे घडल्यास मला जाहीर चौकात फाशी द्या. आता लोकांनीच चौकाचौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. मोदींनी स्वत: वधस्तभांकडे गेलं पाहिजे असं आक्षेपार्ह विधान ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊतांनी यावेळी केला आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं २००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करणार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्लाही यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आहे. यावरुन आता देशासह राज्यातील राजकारणही चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून नोटबंदीच्या निर्णयावरुन मोदी सरकारसह राज्यातील शिंदे फडणवीस सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याचवेळी आता संजय राऊतांनी गंभीर आरोप केला आहे.

Sanjay Raut, Narendra Modi
Drugs-on-cruise case : मलिकांनी वानखेडेंवर केलेले आरोप खरे ठरत आहेत..; रोहित पवार म्हणतात..

खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी रविवारी( दि.२१) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर भाष्य केलं. शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत असं खळबळजनक दावा राऊतांनी केला आहे.

आता मोदींसाठी फासाचा दोर पाठवावा का?

संजय राऊत म्हणाले, सामान्य माणसाकडे 2 हजारांच्या नोटा नाहीत. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली पहिली नोटबंदी फसली. त्यानंतर आता दुसरी नोटबंदीही फसली आहे. पहिली नोटबंदी फसली तर मला भरचौकात जाहीर फाशी द्या असे मोदी म्हणाले होते. आता फासाचा दोर आम्ही तुम्हाला पाठवावा का?, याचे उत्तर नरेंद्र मोदीं(Narendra Modi)नी द्यावे.

Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांचा आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचा दावा; तर राऊत म्हणतात...

मोदी प्रायश्चित्त घेणार का?

संजय राऊत म्हणाले, नोटबंदीच्या निर्णयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी खोटे बोलले आहेत. नोटबंदीमुळे साडेतीन ते चार हजार लोक बँकांच्या रांगात मरण पावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे प्रायश्चित्त घेणार आहेत का? पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादचे दुकान किंवा सुरतमधील कपड्याचे दुकान चालवत नाहीत, तर देश चालवत आहेत, याचे भान तरी त्यांनी ठेवावे असा टोला राऊतांनी लगावला.

नोटबंदीचा काहीच फायदा नाही...

नोटबंदीच्या निर्णयामुळे दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्यांचे कंबरडे मोडेल, भ्रष्टाचार कमी होईल, काळा पैसा कमी होईल, असे अनेक दावे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. आता या निर्णयाला 6 वर्षे झाले आहेत. दहशतवाद कमी झाला आहे? आज मणिपूर, जम्मू-काश्मीर या राज्यातील स्थिती पाहा, तेथे दहशतवाद वाढला आहे.

Sanjay Raut, Narendra Modi
Priyanka Gandhi and UP Politics: प्रियंका गांधी युपी'चे राजकारण सोडणार? 2024 च्या आधी होणार मोठे फेरबदल...

...त्यामुळे 40 आमदारांची चांगली धावपळ !

संजय राऊत म्हणाले, शिवसेना(Shivsena)फोडण्यासाठी ज्यांना 50 खोके देण्यात आले, ते सर्व या निर्णयाने हैराण झाले आहेत. आम्हाला 2 हजारांच्या नोटा बदलून द्या अशी मागणी ते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे करत आहेत. अचानक झालेल्या या नोटबंदीच्या निर्णयामुळे या 40 आमदारांची चांगली धावपळ चालली आहे.

फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर...

नोटबंदीच्या निर्णयावरून संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनाच आता 2 हजारांच्या नोटा मागे घेतल्या म्हणून त्रास होत आहे. सर्वाधिक काळा पैसा भाजपकडेच आहे असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com