Sanjay Raut On Ajit Pawar : अजितदादांचा आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचा दावा; तर राऊत म्हणतात...

Mahavikas Aaghadi News : “सगळ्यांची डीएनए टेस्ट करू..''
Sanjay Raut On Ajit Pawar
Sanjay Raut On Ajit Pawar SC Final Decision On ShivSena

Mumbai : राज्यात यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागावाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. पण आता या अजित पवारांच्या दाव्यावरुन आघाडीत पुन्हा एकदा खटके उडण्याचे चिन्हं आहेत.

अजित पवारांनी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी(NCP)च मोठा भाऊ असा दावा केला होता. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. राऊत म्हणाले, “सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की, डीएनए टेस्ट करावी लागेल असा टोलाही राऊतांनी लगावला.

महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजितदादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याहीपेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरतंय हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut On Ajit Pawar
Priyanka Gandhi and UP Politics: प्रियंका गांधी युपी'चे राजकारण सोडणार? 2024 च्या आधी होणार मोठे फेरबदल...

अजित पवार काय म्हणाले होते?

कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात अजित पवारां(Ajit Pawar)नी महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं. तसेच आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल असं विधान केलं होतं.

Sanjay Raut On Ajit Pawar
Jalgaon News : जळगावमध्ये राजकारण पेटलं; महाविकास आघाडीत ‘नॉट आलबेल’; भाजपच्या तिरक्या चालीची नवी खेळी

याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस(Congress)च्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं अजित पवारांनी सांगितल्यामुळे आघाडीत खटके उडण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com