Mumbai News : वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षावर प्राणघातक हल्ला

Vanchit Bahujan Aghadi News : हा हल्ला परमेश्वर रणशूरवर नसून हा आंबेडकर भवना वरील हल्ला आहे.
Vanchit Bahujan Aghadi News
Vanchit Bahujan Aghadi News Sarkarnama

vanchit bahujan aghadi news: वंचित बहुजन युवक आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) मुंबई अध्यक्षावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी घडली. या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

शनिवारी दादर येथील आंबेडकर भवन (Aambedkar Bhawan) येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेशच्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे, त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते.

Vanchit Bahujan Aghadi News
Pune News : पहिल्याच निवडणुकीत आघाडीची वज्रमूठ ढिली ; पुण्याच्या जागेवरील दोन्ही काँग्रेस दाव्याने वाद वाढणार !

शनिवारी सायंकाळी साडे वाजण्याच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञात व्यक्तींनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चॅापरने जीवघेणा हल्ला केला, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी दिली आहे.

Vanchit Bahujan Aghadi News
Gautami Patil : माधुरी दीक्षितला हा सल्ला कुणी दिला नाही..; गौतमीसाठी अंधारेंची 'पाटीलकी'...

"हा हल्ला परमेश्वर रणशूरवर नसून हा आंबेडकर भवना वरील हल्ला आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड कडे संशयाची सुई आहे. या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनते तर्फे निषेध व्यक्त करतो. आंबेडकर भवन वरील हल्ला खपवून घेणार नाही. जनतेत संतप्त प्रतिक्रिया आहे, असे रेखाताई ठाकूर यांनी सांगितले.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com