Pune News : पहिल्याच निवडणुकीत आघाडीची वज्रमूठ ढिली ; पुण्याच्या जागेवरील दोन्ही काँग्रेस दाव्याने वाद वाढणार !

Pune loksabha election : पुण्याच्या जागेवरुन आघाडीत ठिणगी ..
Pune loksabha election news
Pune loksabha election news Sarkarnama

Pune loksabha election : खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काही नावांची चर्चा सुरु आहे. या जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा ठोकला आहे. त्यामुळे पुण्याच्या जागेवरुन आघाडीत ठिणगी पडल्याचे दिसते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात अप्रत्यक्षपणे पुण्याच्या जागेवर दावा ठोकला. त्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी आमदार मोहन जोशी यांनी ही जागा आम्हीच लढविणार असल्याचे ठामपणे सांगितले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच या जागेवरुन दोन्ही काँग्रेसमध्ये जुंपल्याचे सध्याचे चित्र आहे.

Pune loksabha election news
Pune News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार का ? ; अजितदादांनी सांगितली आतल्या गोटातील माहिती..

अजित पवार म्हणाले, "पुणे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यावर ज्या मित्रपक्षाची ताकद जास्त असेल त्याला ही जागा मिळेल, कुणाची ताकद जास्त हे कसं मोजणार, त्याचे वजन करायचं का, तर नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची माहिती घेऊन या निवडणुकांमध्ये कुणाला किती मते मिळाली, त्यावरुन अंदाज घेण्यात येईल,"

पुणे लोकसभेची जागा काँग्रेसला मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. पुण्याची जागा लढण्याची इच्छा यापूर्वी काँग्रेसचे नेते, विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आज (शनिवारी) मोहन जोशी यांनीही या जागेवर दावा ठोकला. "पुणे लोकसभेची जागा आम्हीच लढणार," असे जोशी म्हणाले.

Pune loksabha election news
Pune Lok Sabha constituency : पुणे लोकसभा पोटनिवडणूक ; पक्षाने संधी दिली तर त्याचं सोनं करण्याची मुळीकांची तयारी !

पुणे टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा अजित पवारांनी घेतला. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलं आहे. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार नाही. पण या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com