विमानतळाच्या उद्घाटनाला कोणाला बोलावयचे, हे महाराष्ट्र सरकार प्रोटोकाॅलनूसार ठरवेल..

बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव या विमानतळाला देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
Uday Samant Press News sindhudurg
Uday Samant Press News sindhudurg

सिंधुदुर्ग ः चिपी विमानतळाच्या उद्घाटन व श्रेयवादाची लढाई शिवसेना व भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरूच आहे. परंतु विमानतळाच्या उद्घाटनाला केंद्रीय उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. (The Maharashtra government will decide who will be invited to the inauguration of the airport as per protocol.) या व्यतिरिक्त कोणाला बोलावयाचे याचा निर्णय महाराष्ट्र सरकार, एमआयडीसी व पर्यंटन विभाग प्रोटोकाॅलनूसार घेईल असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

चिपी विमानतळ उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण तथा पालकमंत्री उदय सांमत यांनी केली. (Chipi Aitport Inogration, Sindhudurg) त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना सामंत यांनी उद्घाटन कार्यक्रमाविषयी माहिती दिली. (Mp Vinayak Raut, Shivsena) सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचं उद्घाटन केंद्रीय हवाईमंत्री जोतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन प्रसंगी कोणतेही राजकारण करायचं नाही, उद्घाटनाला कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हे महाराष्ट्र सरकार, एमआयडीसी व पर्यटन विभाग प्रोटोकॉल नुसार बोलवतील.( Minister Uday Samant, Maharashtra) जे येतील त्या सगळ्यांच स्वागतच केले जाईल.

दरम्यान,  चिपी विमानतळाच्या नामकरणाची मागणी देखील समोर आली आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव या विमानतळाला देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तसा प्रस्ताव लवकरच पाठवला जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा शिवसेना प्रयत्न करते आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी खासदार विनायक राऊत यांनी विचारला. त्यावर कोणतेही श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही, कोकणवासियांना अवघ्या २५०० रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास करायला मिळणार आहे, याचाच आम्हाला आनंद असल्याचे राऊत म्हणाले.

सुरेश प्रभूंना बोलावणार..

चिपी विमानतळ कोणी सुरु केला हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासीयांना विमानतळाच्या माध्यमातून सेवा मिळावी हा हेतू आहे. चिपी विमानतळाच्या चारही बाजूंना रस्त्याची कनेक्टीव्हिटी असावी अशी आखणी केली आहे. पिंगुळी ते चिपी विमानतळ रस्ता उद्घाटनापर्यंत खड्डे मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्यासाठी निधी देखील उपलब्ध आहे. मात्र पाऊस गेल्यानंतर हा रस्ता करणार असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. माजी खासदार व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना देखील या उद्घाटन सोहळ्याला बोलावणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com