मराठा क्रांती ठोक मोर्चा मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार..

न महिने उलटून गेले तरी मराठा समाजाच्या व छत्रपती संभाजी राजे यांनी सुचवलेल्या पर्यांयांसदर्भात काहीच निर्णय घेण्यात आला नाही.
मराठा क्रांती ठोक मोर्चा मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार..
Maratha Kranit Thok Morcha- Uddhav Thackeray News Aurangabad

औरंगाबाद ः मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजाराहोणासह विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी शहरात येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (Maratha Kranti Thok Morcha to block Chief Minister's convoy)

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण व समाजाच्या मागण्यांवर कुठलाच ठोस निर्णय घेतला नाही, त्यांनी मराठा समाजाची तर फसवणूक तर केलीच, पण छत्रपती सभाजीराजे यांची देखील दिशाभूल केल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाने केला आहे. (Maratha Kranti Thok Morcha, Aurangabad)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते येत्या १७ सप्टेंबर रोजी म्हणेजच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी शासकीय ध्वजारोहण केले जाणार आहे. (Chief Minister Uddhav Thackeray,Maharashtra) या शिवाय पैठण येथील संतपीठाचे लोकार्पण यासह अनेक विकासकामांचे भुमीपूजन, उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

या पार्श्वभूमीमवर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे रमेश केरे पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा दिला आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर या समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने सरकार व मुख्यमंत्र्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकार म्हणून जे समाजासाठी करणे शक्य आहे, ते करा, अशी मागणी करत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना काही पर्याय, मार्ग सुचवले होते. त्यावर महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

परंतु दोन महिने उलटून गेले तरी मराठा समाजाच्या व छत्रपती संभाजी राजे यांनी सुचवलेल्या पर्यांयांसदर्भात काहीच निर्णय घेण्यात आला नाही. हा मराठा समाज व छत्रपती संभाजी राजे यांचा अपमान आहे. याची जाणीव करून देण्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यासाठी १७ सप्टेबंर रोजी आम्ही मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणार, असल्याचे मरा्ठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in