लसीकरण केंद्राच्या उद्धाटनाला बोलावले नाही; काॅंग्रेस आमदार परब यांच्यावर नाराज - The inauguration of the vaccination center was not called, angering local MLA | Politics Marathi News - Sarkarnama

लसीकरण केंद्राच्या उद्धाटनाला बोलावले नाही; काॅंग्रेस आमदार परब यांच्यावर नाराज

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 मे 2021

हा एका वार्डाचा कार्यक्रम होता तो विधानसभेचा कार्यक्रम नव्हता. तरी देखील झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत त्यांचा प्रोटोकॉल सांभाळला गेला पाहिजे.

मुंबई ः वांद्रे येथे सुरू करण्यात आलेल्या कोरोना लसीकरण केंद्राच्या उद्धाटनाला काॅंग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांना आमंत्रित न केल्यामुळे ते नाराज झाले आहेत. (Congress Mla Zhishan Siddiqi Upset, Because no Invitestion) मंत्री अनिल परब यांनी आपल्याला या कार्यक्रमापासून डावलल्याचे सांगत ते मतदारसंघात आपल्याला काम करू देत नाहीत, असा आरोप देखील ट्विटच्या माध्यमातून सिद्दीकी यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील हा नवा वाद आता समोर आला आहे.

वांद्रे येथील लसीकरण केंद्राचे उद्धाटन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या मतदारसंघातून काॅंग्रेसचे झिशान सिद्दीकी हे निवडून आलेले आहेत.(Minister Anil Parab Inogration Vaccine Center in Siddiquis Constituency) या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व इतर कार्यकर्त्यांना आंमत्रित करण्यात आले होते. परंतु ज्या सिद्दीकी यांच्या मतदारसंघात लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले त्यांनाच कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. अनिल परब यांनी या केंद्राचे उद्घाटन केले आणि ते निघून गेले.

त्यानंतर सिद्दीकी यांनी ट्विट करत या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक आमदार म्हणून मला कार्यक्रमाला बोलवणे आवश्यक होते. पण मला डावलण्यात आले. माझ्याच मतदारसंघातील कार्यक्रमाला मला न बोलवणे योग्य नाही. अनिल परब हे वरिष्ठ मंत्री आहेत. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने जनतेची काम करत असतो.

पण परब यांच्याकडून माझ्या मतदारसंघात अनेकदा हस्तक्षेप केला जातो. मला काम करू दिले जात नाही. (Mla Siddiqi Said Minister Parab Interfer In My Constituencey) मतदारसंघातील अनेक विकास कामांमधील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी मी केली. पण ती केली जात नाही, ती होऊ दिली जात नाही, असा आरोपही केला. हे आरोप करत असतांना  झिशान सिद्दीकी यांचा रोख मंत्री अनिल परब यांच्याकडे होता, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

हा वार्डाचा कार्यक्रम, विधानसभेचा नाही..

दरम्यान, झिशान सिद्दीकी यांच्या नाराजीवर अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे. परब म्हणाले, मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्येक वार्डामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. ( Thish Progame Is in Ward, not Asseembely Counstituency says parab) मला वॉर्ड ऑफिसरचा फोन होता आणि माझ्या घराबाहेर जवळच लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलं म्हणून मी त्याच उद्घाटन केलं. स्थानिक नगरसेवक, माजी महापौर अशा तीन-चार जणांनी पण उद्घाटन केलं

हा एका वार्डाचा कार्यक्रम होता तो विधानसभेचा कार्यक्रम नव्हता. तरी देखील झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत त्यांचा प्रोटोकॉल सांभाळला गेला पाहिजे. कोणाला बोलवायचं, कोणाला नाही बोलवायचं हा प्रश्न महानगरपालिकेचा आहे. मला लेखी निमंत्रण नव्हतं पण घराबाहेर असल्यामुळे मी जाऊन उद्घाटन केलं.

स्थानिक आमदारांच्या हस्ते देखील उद्घाटन झालं पाहिजे मी या मताचा आहे. यात राजकारण आणू नये, असेही परब यांनी स्पष्ट केले. आणखी सहा वार्डात लसीकरण केंद्र होणार आहे, त्यांचे उद्घाटन सिद्दीकी यांच्या हस्ते व्हायला हवे. 

मी लहान गोष्टीत लक्ष घालत नाही, पण त्यांचा काही गैरसमज  झाला असेल तर आम्ही लक्ष घालू. झिशान सिद्दीकी हा तरुण कार्यकर्ता आहे, त्यांनी चांगलं काम करावं, त्यांना लोकांनी निवडून दिले आहे, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, असेही परब म्हणाले.

ही बातमी पण वाचा ः मंत्रीपद नाकारल्याने नाराज असलेल्याल्या सावंतांनी अखेर शिवसेना नेतृत्वाशी जुळवून घेतले

Edited By : Jagdish pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख