सिनेअभिनेत्री करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी.. - Demand to file a case against actress Kareena Kapoor | Politics Marathi News - Sarkarnama

सिनेअभिनेत्री करीना कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 जुलै 2021

करीना कपूर व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रेग्नसी बायबल नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले.

बीड  : प्रसिद्ध सिनेअभीनेत्री करिना कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Demand to file a case against actress Kareena Kapoor) प्रेग्नसी बायबल नावाच्या पुस्तकावरून ही मागणी ख्रिश्चन महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान ही एका वादात अडकली आहे. पण यावेळी चित्रपटाच्या नावावरून किंवा त्यातील भूमिकेवरून नाही, तर एका पुस्तकाच्या नावावरून ती अडचणीत सापडली आहे. (Film Actrees Kareena Kapoor)

करीना कपूर व सहकारी लेखिका आदिती शहा यांनी प्रेग्नसी बायबल नावाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित केले. बायबल शब्द वापरून ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखविल्याचा आरोप करीना व लेखिकेवर करण्यात आला आहे.

बायबल हा ख्रिश्चन धर्मियांचा पविञ ग्रंथ आहे, पुस्तकावरील बायबल शब्द तात्काळ हटवावा व आभिनेञी करीना कपूर, आदिती शहा व प्रकाशकांनी तात्काळ ख्रिश्चन समाजाची माफी मागावी.

तसेच धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात केली आहे.

हे ही वाचा ः नाना पटोलेंचा डोळा नितीन राऊतांच्या उर्जा खात्यावर..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख