नाना पटोलेंचा डोळा नितीन राऊतांच्या ऊर्जा खात्यावर! 

'आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत पटोलेंनी राष्ट्रवादी आणि पर्यायाने गृहखात्याला 'टार्गेट' केले.
congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News Mumbai
congress State President Nana Patole- Minister Nitin Raut News Mumbai

मुंबई : आधी स्वबळावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी, पाळत ठेवण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांचा रोष, स्वपक्षाचे नितीन राऊतांच्या दिल्लीवाऱ्या, फोन टॅपिंग प्रकरणावरून चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीने  काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढल्याचे बोलले जाते. (Nana Patole's eye on Nitin Raut's energy account) स्वपक्षातील नेते, आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी दुखावल्याने दिल्लीतील काँग्रेसचे काही नेते पटोले यांच्यावर नाराजी असल्याची चर्चा आहे. मात्र, पटोले यांच्या 'स्टाइल'वर काँग्रेस नेते राहुल गांधी खूश असल्याने दिल्ली दरबारातून त्यांना बळ मिळण्याचे संकेत आहेत. शिवाय पटोले यांचा नितीन राऊत यांच्या उर्जा खात्यावर देखील डोळा असल्याचे बोलले जाते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पटोले हे राज्यभर फिरून आक्रमपणे काँग्रेसची भूमिका मांडत आहेत. त्यात सलग दोनदा आगामी निवडणुकांत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे पटोले यांनी जाहीर केले. (Congress State President Nana Patole) त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पटोले यांच्यावर प्रत्यक्षपणे टीका केली. त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ठाकरे हे पटोले यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले आहे. (Energey Minister Nitin Raut) त्यानंतर स्वबळाच्या हाकेपासून मागे येण्याचा सल्ला पटोले यांना दिल्लीत बोलावून वरिष्ठांनी दिला. त्यावरून पटोले यांच्याबाबत उलटसुलट चर्चा रंगली.

या घटना ताज्या असतानाच 'आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत पटोलेंनी राष्ट्रवादी आणि पर्यायाने गृहखात्याला 'टार्गेट' केले. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पटोले यांना फटकारले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इतरांकडून शिकवण घेण्याचा सल्ला त्यांना दिला. त्यामुळे आघाडीत नव्या वादाला सुरूवात झाली असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याला फोडणी दिली. त्यामुळे घटकपक्षांतील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले.

दरम्यान, काँग्रेसचे नेते, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडील खाते पटोले यांना हवे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पटोले, राऊत यांच्यावर कुरघोड्या करत असल्याचेही सांगितले जाते. त्यातून राऊत हे दिल्ली गाढून पटोले यांच्याविरोधात तक्रारी करत असल्याचीही  चर्चा आहे. अशा स्थितीत काँग्रेसमधील काही मंत्री, आमदार खासदार, पदाधिकारीही पटोलेंना विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. पटोले त्यांच्याबाबत कान भरत असल्याने काँग्रेसचे नेते पटोले यांच्यावर नाराज असल्याचे कळते.

Edited By : jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com