कृष्णप्रकाश यांचा ऑनलाईन पोलिस बदल्यांचा फंडा; व्हीसीव्दारे २५६ केल्या अंमलदारांच्या बदल्या

त्यांच्या पसंतीनुसार लगेचच गुरुवार व शुक्रवारी त्यांच्या बदल्या केल्या. त्यात तीस जमादार, ९४ हवालदार आणि १३२ पोलिस नाईक यांचा समावेश आहे.त्यांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.
Krishnaprakash's online police transfer funda; Transfers of 256 officers made by VC
Krishnaprakash's online police transfer funda; Transfers of 256 officers made by VC

पिंपरी : ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतील मोठी आर्थिक देवाणघेवाण आणि हफ्तेखोरीमुळे राज्य पोलिस दल आणि त्यातही मुंबर्ई पोलिस नुकतेच टीकेचे धनी झाले. त्यामुळे त्यातून धडा घेत पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी आपल्या अंमलदारांच्या बदल्या पारदर्शकपणे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी २५६ अंमलदारांच्या बदल्या त्यांच्या इच्छेनुसारच्या ठिकाणी व्हीसीव्दारे करीत त्यांना सुखद धक्का दिला. Krishnaprakash's online police transfer funda; Transfers of 256 officers made by VC

यानिमित्त त्यांच्या अडीअडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृष्णप्रकाश तथा केपी यांची ही बदल्यांची आधुनिक संकल्पना आहे. त्यांच्या या ऑनलाईन बदल्यांचा आदर्श राज्यातील इतर आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षक तथा एसपी यांनी घेण्यासारखा आहे. नुकत्याच पिंपरी-चिंचवड महापालिका आय़ुक्त राजेश पाटील यांनी एकाच खात्यात गेली कैक वर्षे ठाण मांडून बसलेले वतनदार कर्मचारी, अधिकारी यांची तेथून उचलबांगडी केली. तसेच काहिसे धोरण पोलिस आयुक्तांनीही अंगीकारले. 

मात्र, या बदल्या करताना त्यांनी सबंधितांची इच्छा तथा बदलीच्या ठिकाणचा प्राधान्यक्रमही विचारात घेतली. कृष्णप्रकाश, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे,पोलिस उपायुक्त (मुख्यालय) सुधीर हिरेमठ, पोलिस उपायुक्त (परिमंडळ एक) मंचक इप्पर यांनी बुधवारी (ता. २८) बदलीसाठी पात्र म्हणजे कार्यकाळ पूर्ण झालेल्या अंमलदारांशी व्हिडिओ कॉन्फऱन्स तथा व्हिसीव्दारे संवाद साधला. 

त्यांच्या पसंतीनुसार लगेचच गुरुवार व शुक्रवारी त्यांच्या बदल्या केल्या. त्यात तीस जमादार, ९४ हवालदार आणि १३२ पोलिस नाईक यांचा समावेश आहे. त्यांना ताबडतोब बदलीच्या ठिकाणी हजर होण्यास सांगण्यात आले आहे.या पद्धतीने आणखी ९९ पात्र अंमलदारांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले. अशा बदल्यांमुळे पोलिस दलात उत्साह संचारला असून त्यांचे मनोबल उंचावल्याचा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com