आम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम - Let us fight alone, then see Dum | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

आम्हाला एकट्याला लढू द्या, मग बघा दम

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवल्या जातील, असे सांगितले होेते.

मुंबई : आम्हाला एकट्याला लढू द्या, मग पहा, अशी अशी आव्हानाची भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली आहे. आम्हाला स्वबळावर लढू द्या, असा आग्रह त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) यांच्याकडे केला आहे. (Let us fight alone, then see Dum)

काॅंग्रेसच्या वतीने राहुल गांधींचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पंतप्रधान करायचंच असा निश्चय काँग्रेस नेत्यांनी केला आहे. त्यासंबंधी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढवल्या जातील, असे सांगितले होेते. पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष मात्र 'एकला चलो' चा नारा देत आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे सरकार पाच वर्षे टिकेल, आणि महाविकास आघाडी बुलंद राहिल, असं सांगितलं होते. सध्या तरी महाविकास आघाडी घट्ट असून, हे सरकार पाच वर्षे टिकेल असे शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या. तर राष्ट्रवादीचेकडूनही तशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

 

हेही वाचा..

फळपीक योजनेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा : विखे

शिर्डी : ‘‘हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेतील प्रमाणकांमध्‍ये (ट्रीगर) तातडीने बदल करावेत या आपल्या मागणीची मुख्‍यमंत्र्यांनी दखल घेऊन, या योजनेतील जाचक अटी रद्द करण्‍याचा निर्णय घेतला. त्यामुळे फळपीक उत्‍पादकांना दिलासा मिळून, या योजनेत सहभाग घेण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे,’’ अशी माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘राज्‍य सरकारने पुनर्रचित हवामान आधारित फळ‍पीक विमा योजना लागू केली होती. मात्र, योजनेतील निकष हे शेतकऱ्यांचे नव्‍हे, तर कंपन्‍यांचे हित जोपासणारे होते, ही गंभीर बाब नऊ मार्च २०२० रोजी मुख्‍यमंत्र्यांच्‍या निदर्शनास आणून दिली होती. मागील अर्थसंकल्‍पीय अधिवेशनातही या प्रश्‍नावर आवाज उठवून नफेखोरी केलेल्‍या कंपन्‍यांवर टीकेची झोड उठविली होती. याबाबत राज्‍य सरकारने मागणीची दखल घेऊन फळपीक विमा योजनेच्‍या निकषात बदल करीत, फळबाग उत्‍पादकांना दिलासा देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.’’
 

 

हेही वाचा..

भाजपचे ओळखपत्र दाखवा अन पेट्रोल मिळवा

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख