भाजपचे ओळखपत्र दाखवा..पेट्रोल मोफत मिळवा..शिवसेनेने डिवचले..   - Petrol and diesel distribution in cheap rates Shiv Sena attack BJP | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

भाजपचे ओळखपत्र दाखवा..पेट्रोल मोफत मिळवा..शिवसेनेने डिवचले..  

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 जून 2021

शिवसेनेने वर्धापनदिनी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करुन मोदी सरकारला टोला लगावला आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेकडून डोंबिवलीमध्ये एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देण्याचे उपक्रम शिवसेनेने केला होता. या माध्यमातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारचा उपक्रमाचे आयोजन आज शिवसेनेच्या वर्धापनदिनी करण्यात आला होता.  या उपक्रमामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Petrol and diesel distribution in cheap rates Shiv Sena attack BJP

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करुन मोदी सरकारला टोला लगावला आहे. वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल विक्री करणार असल्याचे पोस्टर लावले आहे. त्यांनी टि्वट करुन त्यांची घोषणा केली आहे. 

"शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त  सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल आणि भाजप सदस्यत्वाचे  ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल मोफत वाटप करण्यात येणार आहे," असे टि्वट आमदार वैभव नाईक यांनी केल आहे. 

विनाकारण अंगावर याल तर जिथल्या तिथे हिशेब करु..वर्धापदिनी शिवसेनेचा इशारा   
मुंबई : शिवसेनेचा आज ५५ वा वर्धापनदिन. आजचा वर्धापनदिन शिवसेना साध्या पद्धतीने साजरा करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज फेसबूकच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून शिवसेनेच्या Shivsena 55th Foundation वाटचालीवर प्रकाश टाकला आहे. "महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत," अशा इशारा शिवसेनेने दिला आहे. 
 Edited by : Mangesh Mahale 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख