अनेकदा मुख्यमंत्री झाले तरी पवारांनी मराठा आरक्षण का दिले नाही : मुनगंटिवारांचा सवाल

विधानसभेचे विशेष अधिवेशन घेता येत. या विशेष अधिवेशनात निर्णय घ्या, अशी मागणी मुनगंटिवार यांनी केली.
Why did Sharad Pawar remain silent on Maratha reservation despite being the Chief Minister many times ....
Why did Sharad Pawar remain silent on Maratha reservation despite being the Chief Minister many times ....

मुंबई : पवार साहेब तुम्ही एकदा नव्हे अनेकदा कधी काँग्रेसचे तर कधी काँग्रेस सोडून पुलोदचे मुख्यमंत्री झाला. मग तुम्हाला कधी वाटलं नाही की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असा प्रश्न भाजपचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे. (Sudhir Mungantiwar criticizes Sharad Pawar)

खासदार शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणासाठी झालेल्या घटनादुरूस्तीबद्दल सविस्तरपणे भूमिका मांडत या दुरूस्तीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचा भ्रम पसरविण्यात येत असल्याची टीका मोदी सरकावर केली होती.

याबाबत शरद पवारांवर निशाणा साधताना मुनगंटिवार म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाकडे बोट पवारांनी बोट दाखविले आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी त्यांनी केली आहे. श्री. पवार मंत्री असताना हा निर्णय का घेतला गेला नाही? मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ओबीसींच्या जनगणनेत संवैधानिक अडचण असल्याचे तेव्हा सांगून तशी जनगणना करण्यात आलेली नाही. पण गोपीनाथ मुंडें यांनी जेव्हा हा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे केला गेला.

``पवार साहेब, तुम्ही एकदा नव्हे अनेकदा मुख्यमंत्री होता. कधी काँग्रेसचे मुख्यमंत्री, कधी काँग्रेस सोडून पुलोदचे मुख्यमंत्री झाला होता. मग कधी तुम्हाला वाटलं नाही की मराठा समाजाला आरक्षण द्यावे. निवडणुका तोंडावर ठेवून पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा आरक्षण दिलं. ते न्यायालयच्या सुनावणी रद्द झाले. विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवारांनी संसदेचे कामकाज चालू ठेवायला भाग पाडयाला हवं होतं? हे कामकाज सुरू राहिलं असतं तर काय भीती होती? मराठा आरक्षणाची चर्चा संसदेत करण्याइतका हा महत्त्वाचा विषय वाटला नाही,``अशी टीका त्यांनी केली.

मागासवर्गीय कर्मचारी अधिकार्‍यांची पदोन्नती, राज्य लोकसेवा आयोगावर सदस्य नियुक्ती यावर शरद पवार पत्रकार परिषद घेत नाहीत. पण मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ती घेतली जाते. काँग्रेसही ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात  बैठक घेत नाही. पण विधीमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात ओबीसींच्या आरक्षणासाठी आम्ही आवाज उठवला म्हणून भाजपचे बारा आमदार निलंबित केले, याकडे मुनगंटिवार यांनी लक्ष वेधले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com