खळबळजनक : महाबळेश्वरातील गुहेतील वटवाघळात आढळला निपाह विषाणू.....

या व्हायरसवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे मृत्यूदर वाढण्याची भिती आहे. गेल्या काही वर्षात वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. ज्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली होती.
Sensation: Nipah virus found in Bats in Robbers cave in Mahabaleshwar .....
Sensation: Nipah virus found in Bats in Robbers cave in Mahabaleshwar .....

सातारा : कोरोनाच्या महामारी कमी होतेय ना तोच आणखी एक चिंता वाढविणारी माहिती समोर आली आहे. वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात याबाबतची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळला आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरातील एका गुहेत हे वटवाघुळ आढळले होते. यातील काही प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेऊन संशोधन केले होते. 

जागतिक आरोग्य संघटनेने रोगांच्या यादीत पहिल्या दहा मध्ये निपाह व्हायरसला ठेवले आहे. हा वटवाघुळांमध्येच आढळतो. माणसांपर्यंत हा विषाणू पोहोचल्यास मोठ्याप्रमाणात मृत्यू होण्याची शक्यता असते. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे मोठ्याप्रमाणात मृत्यू झाले होते. एनआयव्हीने यासंदर्भात केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. या नुसार भारतात आतापर्यंत चार वेळा निपाह व्हायरस आढळला आहे.

या व्हायरसवर कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे मृत्यूदर वाढण्याची भिती आहे. गेल्या काही वर्षात वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. ज्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. कोरोनाच्या उद्रेकामागेही वटवाघुळ असल्याचाही दावा काही शास्त्रज्ञांनी केलेला आहे. मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरातील एका गुहेतील वटवाघुळांचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठविले होते. येथील शास्त्रज्ञांनी यावर केलेल्या संशोधनपर अभ्यासात निपाह विषाणू आढळला आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीला तोंड देतानाच आता महाबळेश्वरमधील वटवाघुळांच्या नमुन्यात हा घातक विषाणू आढळल्याने सातारकरांच्या चिंतेत भर पडली आहे.  

'रॉबर्स केव्ह' निपाह व्हायरसमुळे पुन्हा चर्चेत....

महाबळेश्वर येथील मालूसर गावच्या पश्चिमेस असलेल्या वैशिष्टय़पूर्ण 'रॉबर्स केव्ह' म्हणजेच 'चोराची गुहा' आता त्यातील वटवाघुळांमुळे पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. महाबळेश्वरपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावरील मालूसर गावच्या पश्चिमेस ही 'रॉबर्स केव्ह' ऊर्फ चोराची गुहा नामक गुहा आहे. ही गुहा नुसतीच ब्रिटिशकालीन आहेत. अनेक अनमोल ठेवेंची खाण आहे.

सुमारे एक ते दीड किलोमीटर लांब असलेल्या या वैशिष्ठय़पूर्ण गुहेची रचनाही वैशिष्ठय़पूर्ण आहे. वर संपूर्ण मोकळे पठार त्याच्या चारी बाजूला घनदाट जंगल व खालून सुमारे एक किलोमीटर लांबीची ही गुहा असा हिचा थाट आहे. या गुहेत आजमितीस हजारो वटवाघळे आहेत. आता या वटवाघळांमुळे ही गुहा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या गुहेतील वटवाघळांच्या नमुन्यांची चाचणी केली असता त्यामध्ये निपाह विषाणू आढळला आहे. त्यामुळे ही गुन्हा आता चर्चेचा विषय ठरली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com