Pub, Disco Bars discount offer; Ganeshotsav only in captivity .....
Pub, Disco Bars discount offer; Ganeshotsav only in captivity .....

पब, डिस्को बारना सवलतीचा प्रसाद; गणेशोत्सव मात्र बंदिवासात.....

राज्य सरकारने बंधने टाकली असतील तर त्यांनी आपली कर्तव्ये पण करावीत, असे सांगून श्री. शेलार म्हणाले, संविधानामध्ये कर्तव्ये व बंधनेही दिली आहेत. सरकारने बंधने दिली असतील, तर सरकारने कर्तव्ये जरू करावीत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी Ganesh Festival नियमावली लागू करताना सरकारने सर्वसमावेशक चर्चा करणे गरजेचे होते. एकीकडे पब, डिस्को बारना सवलती दिल्या जात असतील तर गणेशोत्सवावर निर्बंध का, असा प्रश्न करून सरकारने संपूर्ण राज्याची बंदिशाळा करून ठेवली असून याचा राज्य सरकारने पूर्नविचार करावा. गणेशोत्सवावर निर्बंध हा बिनडोक प्रकार असून ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी गणेशोत्सवावरील निर्बंधावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. Pub, Disco Barna discount offer; Ganeshotsav only in captivity criticizes Ashish Shelar

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली आज जारी केली. याची भाजपचे नेते आशिष शेलार यांनी खिल्ली उडवत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, राज्य सरकारने संपूर्ण राज्याची बंदिशाळा केली आहे. रोज नवे निर्बंध टाकले जात आहेत. गणेशोत्सवाला मर्यादा घातल्या आहेत. संस्था, संघटनांशी कोणतीही चर्चा केलेली नही.

नियमावली लागू करताना त्यांनी सर्वसमावेशक चर्चा करणे गरजेचे होते. घरातच संगमरवरी मूर्तीचे पुजन करा. पारंपारीक पद्धतीने गणेश पूजन करू नका. विसर्जनाच्या आधीची आरती सुध्दा घरीच करा. आता विसर्जनाची आरतीही करू नये. गणेशोत्सव काय कराचीत करायचा का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. राज्य सरकारने याचा पुर्नविचार करावा. सगळ्यामध्ये सर्वसमावेशकता असली पाहिजे. एकीकडे पब, डिस्को बारना सवलती दिल्या असतील तर गणेशोत्सवावर निर्बंध का. 

कोरोनात काळजी घेतली पाहिजे. आपण प्रादुर्भाव रोखला पाहिजे, हे बरोबर आहे. भजनात सुरक्षित अंतर ठेव हे पण ठिक आहे. पण गणेश मूर्तींच्या उंचीवरून कोरोनाच्या प्रादुर्भावाचा संबंध लावला जात आहे. हा कुठला जावई शोध आहे असा प्रश्न करून त्यांनी राज्य सरकारने याचा पूर्नविचार करावा, अशी मागणी केली. सध्या जुलै महिना सुरू होत आहे. तब्बल ७० दिवसांनी गणेशोत्सव होत आहे. कारखानदार, मूर्तीकार यांचे तीन ते चार महिने आधी काम सुरू होते.

साळगावकरांचा महासंघ असो कि दाभोळकरांची समन्वय समिती असो.. हे दोघेही मागणी करत होते. सरकारने वेळीच सांगावे. गणेश मूर्तीकारांचे हे तेच
म्हणणे होते. पण सरकारने आज अचानक ७० दिवस आधी निर्बंध जारी केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत केलेल्या मूर्तींचे काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे बरोजगारी, आर्थिक खचता अवस्था आहे. त्यातच राज्य सरकार कलाकारांना मदत करत नाही. या उत्सवावर आर्थिक व्यवहार व रोजगार उभा आहे.

इतक्या कमी दिवसांत मूर्ती कशा करायच्या तसेच यापूर्वी केलेल्या मूर्तींचे काय करायचे. माझे तर म्हणणे आहे की, राज्य सरकारचा हा बिनडोक प्रकार आहे. ठाकरे सरकारचा बिनडोकपणे वागत आहे. त्यांचा निषेध करायचा तेवढा थोडा आहे. राज्य सरकारने बंधने टाकली असतील तर त्यांनी आपली कर्तव्ये पण करावीत, असे सांगून श्री. शेलार म्हणाले, संविधानामध्ये कर्तव्ये व बंधनेही दिली आहेत. सरकारने बंधने दिली असतील, तर सरकारने कर्तव्ये जरू करावीत. मूर्तीकार, कारखानदार तसेच येथे रोजगार करणारे लोक आहोत, त्यांच्या रोजगारावर तसेच आर्थिक गणितावर यामुळे गदा आली आहे. त्यांना मदत केली पाहिजे.

हा श्रध्देचा विषय असून राज्याची या सरकारने बंदिशाळा करून टाकली आहे. एकीकडे मंदीरे बंद आहेत. मात्र, सगळे चालू आहे. गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध आणत आहे, याचे काय कारण आहे. नियम नियमावली जरूर द्या, घरगुती गणेशोत्सवालाही दोन फुटाचे बंधन कशासाठी. माझ्या घरात किती उंचीची मूर्ती बसवावी, यावर सरकारने निर्बंध आणण्याचे कारण स्पष्ट करावे. कोरोनाची नियमावली, विसर्जनाची नियमावली, सार्वजनिक असेल तर त्या ठिकाणी सॅनिटायझेशन, विसर्जन मिरवणूकांमध्ये कमतरता हे समजू शकतो. हा सगळा बिनडोक प्रकार सुरू असून याचे खापर ठाकरे सरकारवर आहे, अशी टीका ही त्यांनी केली.  
 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com