राजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस - This is not the time for politics; Sharad Pawar's suggestion is correct: Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

राजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 28 जुलै 2021

. ज्या कुटुंबात कोणी उरलेलं नाही. अशांच्याबाबत शासनाला वेगळा विचार करावा लागणार आहे. मुख्ममंत्री निधीतून त्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे.

कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. दरम्यान, राजकारण करण्याची किंवा कोण बरोबर कोण चुक हे पाहण्याची वेळ नाही. लोकांचे कायमचे पुनर्वसन करण्यची गरज असून आता सरकारने यामध्ये लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. This is not the time for politics; Sharad Pawar's suggestion is correct: Fadnavis

आंबेघर येथील बाधितांचे तात्पुरते स्थलांतरण मोरगिरी येथील मोरणा विद्यालयात करण्यात आले आहे. या ठिकाणी श्री. फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार नरेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सरचिटणीस अतुल भोसले, भरत जाधव, कऱ्हाडचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते.

हेही वाचा : एकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे!

फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे दुःख मोठे आहे. त्या गावातील कुटुंबाचे कायमचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. सरकारने त्यात लक्ष घालावे. त्यासाठी  पुरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करावी. अतिवृष्टीमध्ये दरड कोसळून लोकांचा मृत्यू झालेला आहे.  यामध्ये अनेकांचे संसार, कुटुंब उद्धवस्त झाली आहेत.  

आवश्य वाचा : आता SIT करणार परमबीर सिंग प्रकरणाचा तपास

त्यामुळे त्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता आहे. त्यांना शेड बांधून निवाऱ्याची सोय करावी लागणार आहे. त्याकरिता त्यांच्या पसंतीची जागा बघावी लागणार आहे. ज्या कुटुंबात कोणी उरलेलं नाही. अशांच्याबाबत शासनाला वेगळा विचार करावा लागणार आहे. मुख्ममंत्री निधीतून त्यांना जास्तीत जास्त मदत झाली पाहिजे. त्याच्या राहण्याची कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. 

मोठ्याप्रमाणात पाऊस झाल्याने शेती व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटना या अपवादात्मक परिस्थितीत घडत असतात. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी मदत पोहचवण्याचे काम केले जाते. यामध्ये लोकांना आर्थिक मदत, रोजगार उपलब्ध करून दिली पाहिजे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नयेत, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे. सध्याची ही वेळ राजकारण करण्याची किंवा कोण बरोबर कोण चुक हे पाहण्याची नाही. लोकांचे कायमचे पुनर्वसन करण्यची गरज असून आता सरकारने यामध्ये लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख