एकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेही बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.
एकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे!
Sanjay Raut .jpg

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला नामोहरण केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होत आहेत. त्यामुळेच त्या दिल्लीमध्ये विविध विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटत आहेत. त्यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हेही बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत. (ShivSena MP Sanjay Raut criticizes BJP) 

त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे. ते दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले चार-पाच दिवस दिल्लीत आहे. याच दरम्यान ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यामुळे त्याच्या नेतृत्वाविषयी देशात आकर्षण आहे. भाजपने  बंगालमध्ये मोठा निवडणूक खर्च केला. धनशक्तीचा वापर केला. तरी ममता बॅनर्जी निवडून आल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना देखील त्यांचे कौतुक असेलच, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.  

विरोधी पक्ष त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. देशात समर्थ पर्याय उभा राहतो का हीही पाहावे लागेल. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ममता बॅनर्जी भेटणार आहेत. मी असे कुठे म्हणालो कि ममता बॅनर्जी यांनी नेतृर्त्व करावे. मी  ममता बॅनर्जी याना भेटणार आहे, असे राऊत म्हणाले.   

अनेक नेत्यांनी एकत्र येऊन नेतृत्व करावे. आज शिवसेनेचे १८ खासदार आहेत, आणि अनेक प्रादेशिक पक्षांनी देशाचे नेतृत्व केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, शिवसेनेने आधी राष्ट्रीय स्तरावर पक्ष वाढवावा, त्यावर संजय राऊत म्हणाले की ''एकेकाळी २ खासदार असलेला पक्षही आज देशांचे नेतृत्व करत आहे, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. 

Edited By - Amol Jaybhaye

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in