नितेश राणे हे कोकणच्या राजकारणातील दाऊद इब्राहीम....

नितेश राणे यांचा कोकणात दहशतवाद आणि गुंडगिरी सुरू आहे.
Nitesh Rane is Dawood Ibrahim in Konkan politics says Shivsena leader Sandesh Parkar
Nitesh Rane is Dawood Ibrahim in Konkan politics says Shivsena leader Sandesh Parkar

सिंधुदुर्ग : आमदार नितेश राणे म्हणजे कोकणातील राजकारणातील कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आहेत, असा घणाघात  शिवसेनेचे स्थानिक नेते संदेश पारकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला आहे. Nitesh Rane is Dawood Ibrahim in Konkan politics says Shivsena leader Sandesh Parkar

संदेश पारकर म्हणाले, मच्छीमारांच्या संदर्भात बोलायचे झाले तर नारायण राणे तत्कालिन पालकमंत्री असताना पर्ससीन मच्छीमारांची संघटना स्थापन केली होती. त्यांच्याकडून ते खंडणी व हफ्ते गोळा करत होते. यावरून २०१४ च्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत पारंपारिक मच्छिमारांनी निर्णय घेत दोन्ही निवडणूकीत नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पूत्रांना मोठ्या फरकाने पराभूत केले. 

पर्ससीन मच्‍्‍छीमारांचा प्रश्न होता, शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांच्या माध्यमातून तो सोडविला गेला. त्यामुळे पारंपारिक गोरगरीब मच्छीमारांना माहिती आहे की, शिवसेना ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.  पालकमंत्री उदय सामंत यांच्या भावाला सचिन वाझेची उपमा देणारे नितेश राणे नारायण राणेंना कोणती उपमा देतील? सामंतवर आरोप करतायंत ते राणे पैसे गोळा करत होते, त्यांना कोणती उपमा देणार आहात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

नितेश राणे यांचा कोकणात दहशतवाद आणि गुंडगिरी सुरू आहे. कणकवलीतील वकिलांची आणि एका नगरसेविकेची गाडी कोणी जाळली? कुडाळ मधील होंडा शोरुम कुणी जाळले? गोव्यात टोलनाका कोणी फोडला? मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यावर बांगडा फेक कोणी केली? महामार्ग अधिकाऱ्यावर चिखल कोणी ओतला? चिंटू शेखवर गोळीबार कोणी केला? या सगळ्याचे करविते नितेश राणेच असल्याचा आरोप पारकर यांनी केला आहे. या जिल्ह्यात गुंडगिरी, दहशतवाद, खंडणीगिरी कोण वसुल करतंय हे जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील लोकांना माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com