माथाडी चळवळीला मोदी सरकार देशभर नेणार : देवेंद्र फडणवीस 

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा मोफत लसीकरणाचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कोरोना मुक्त भारत'साठीच्या ऐतिहासिक कार्याला चालना देणारा आहे.
Modi government to take Mathadi movement across the country: Fadnavis
Modi government to take Mathadi movement across the country: Fadnavis

ढेबेवाडी : 'माथाडी चळवळ फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादीत न ठेवता ती भारतभर नेण्यासाठी मोदी सरकार त्यावर काम करत आहे. अण्णासाहेब पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचा त्यामुळे वटवृक्ष होवून देशभरातील कष्टकऱ्यांना त्याची सावली मिळेल'. असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे माथाडी हॉस्पीटलच्या माध्यमातून नवीमुंबईत माथाडी भवन येथे माथाडी कामगारांसाठीच्या मोफत कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.

श्री. फडणवीस म्हणाले,' माथाडी कामगारांचे लसीकरण प्राधान्याने होण्यासाठी नरेंद्र
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनतर्फे राबविला जाणारा मोफत लसीकरणाचा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'कोरोना मुक्त भारत'साठीच्या ऐतिहासिक कार्याला चालना देणारा आहे.कोरोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. मात्र, त्याही परिस्थितीत केंद्र शासनाने व्यापार व उद्योग जगवण्याचा व सावरण्याचा प्रयत्न केला. 

एवढ्या मोठ्या देशात लसीकरण कार्यक्रम राबवणे अवघड होते परंतु भारताने स्वतःच्या चार लसी तयार केल्याने आपले इतर देशांवरील अवलंबित्व संपले.आजपर्यंत देशातील ७० कोटी जनतेचे लसीकरण झाले आहे. दररोज ७० लाख लोकांचे लसीकरण होत असून, येत्या डिसेंबरपर्यंत देशातील बहुतांश जनतेचे लसीकरण होऊन देश कोरानातून बाहेर निघेल. पद असो किंवा नसो सकारात्मकदृष्टीने सतत काम केले तर लोकांच्या जीवनात आपण परिवर्तन घडवू शकतो यावर माझा विश्वास आहे.' यावेळी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला लसीचे २० हजार डोस व एक रुग्णवाहिका देणार असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. 

कार्यक्रमास आमदार गणेश नाईक, शशिकांत शिंदे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, नवीमुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, नगरसेविका शुभांगी पाटील, अॅड्. भारतीताई पाटील, माथाडी युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे, मोहन गुरनानी, शंकरराव पिंगळे आदी उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. लसीकरण केलेल्या कामगारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com