राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांच्या जावयांचा पोलिसी पाहुणचार

राष्ट्रवादीच्यानेत्यांचे जावई सध्या सीबीआय आणि एनसीबीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
Sarkarnama (54).jpg
Sarkarnama (54).jpg

पुणे  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहे. काल रात्री देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची सुमारे वीस मिनिटे चौकशी केल्यानंतर त्यांना सीबीआयकडून सोडण्यात आलं. याआधी राष्ट्रवादी कॉग्रेस नेते एकनाथ खडसे  Eknath Khadse यांचे जावई  गिरीश चौधरी यांची सीबीआयने चैाकशी केली आहे. तर नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) चैाकशी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे जावई सध्या सीबीआय आणि एनसीबीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ईडीने अटक केली होती. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गिरीश चौधरी यांना चौकशीनंतर अटक केली होती.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  Nawab Malikयांचे जावई समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. दहा तासांच्या चौकशीनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समीर खान यांना अटक केली होती.  समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावले होते. मुच्छड पानवाला ड्रग्ज प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले होते.

माझ्या जावयाला तरी त्रास द्यायला नको होता
खडसे म्हणाले होते की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माझी ईडीची चैाकशी लावली होती. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. परंतु हा त्रास देणे योग्य नाही. किमान माझ्या जावयाला तरी त्रास द्यायला नको होता. त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना राजकारण माहित नाही. ते २० वर्षापासून परदेशात नोकरी करत आहेत. त्यांचा या प्रकरणात केवळ दोन कोटींचा व्यवहार आहे. पण त्यांना विनाकारण छळले जात आहे. योग्य वेळी जनता उत्तर देईल.

देशमुख याच्यावर 100 कोटीच्या वसूलीचे आरोप करण्यात आला आहे.  यानंतर देशमुखांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन यात सीबीआयनेही स्वतंत्र तपास सुरू केला.  

मोठी बातमी : अनिल देशमुख प्रकरणात CBIच्या अधिकाऱ्याला अटक 
  
मुंबई  : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukhयांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआय़चे उपनिरिक्षकालाअटक केली आहे.  हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयनं केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने सीबीआय कार्यालयातील उपनिरिक्षक अभिषेक तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचं आढळले आहे.  तिवारी यांना सीबीआयने अटक केली आहे. 
  Edited by : Mangesh Mahale
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com