मोठी बातमी : वैद्यकीय परीक्षा आता दहा जूनपासून  - Medical examination now from June ten | Politics Marathi News - Sarkarnama

मोठी बातमी : वैद्यकीय परीक्षा आता दहा जूनपासून 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 19 मे 2021

या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. 

मुंबई : राज्यातील वैद्यकीय (Medical Exams) विद्यार्थ्यांच्या येत्या दोन जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता 10 ते 30 जून दरम्यान, घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती (Chancellor of the University of Health Sciences) तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज दिली. ( Medical examination now from June ten)

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षांसंदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी. एच.एम.एस., बी.पी.टी.एच.,बी.ओ. टी.एच.आणि बीएससी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे. 

हेही वाचा : लशीच्या चाचण्यांतून 525 मुलांच्या जीवाशी खेळ; उच्च न्यायालयात याचिका

या वैद्यकीय पदवी परीक्षांसोबतच मॉडर्न मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आवश्य वाचा : कोरोनावर रेमडेसिविरची मात्राही चालेना; केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार?

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख