लॉकडाउन वाढला; १८ ते ४४ चे लसीकरणही बंद

सध्यातरी प्राधान्यक्रम ४५ वयोगटातील लोकांना दुसरा डोस देण्यावरच असेल. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे अश्यात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Lockdown increased; Vaccination from 18 to 44 is also closed
Lockdown increased; Vaccination from 18 to 44 is also closed

मुंबई : कोरोनाचा संसर्गाचा वेग आता कमी होऊ लागला आहे. पण काही जिल्ह्यात संसर्गाचा वेग कमी होऊ शकलेला नाही. लॉकडाउन (Lock Down) केल्यामुळे राज्यातील कोरोना ग्रोथ रेट (Corona Growth Rate) सात लाखांवरून चार लाखांवर आला आहे. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाच्या  आज झालेल्या बैठकीत लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच घोषणा करतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. दरम्यान, १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण बंद करण्यात आले असून आता केवळ दुसरा डोसच दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Lockdown increased; Vaccination from 18 to 44 is also closed)

अनेक जिल्ह्यात कोरोनाची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे लॉकडाउन सरसकट वाढवलं जाणार की मुंबई, पुणे अशा अनेक ठिकाणी कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. तिथे नागरीकांना सूट दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सर्व पार्श्वभूमीवर आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये लॉकडाउन आणखी ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय झाला आहे.

 यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लॉकडाउनच्या संदर्भात अनेकांना अपेक्षा आहेत. लॉकडाउन केल्यानंतर सात लाखांपर्यंत रूग्ण संख्या पोहोचलेला महाराष्ट्र आता चार लाखांपर्यंत कमी झाला आहे. भारताचा प्रतिदिन वाढीचा दर दीड टक्के तर महाराष्ट्राचा प्रतिदिन वाढीचा दर ०.८ टक्के इतका आहे. या रूग्ण संख्या वाढीचा दराच्या माध्यमातून पॉझिटिव्हीटी रेटमध्ये आपण कमी झालो आहोत. आपण रूग्ण संख्या कमी होत असलेल्या राज्यांमध्ये आहोता.

देशातील ३७ राज्यात महाराष्ट्र ३० व्या क्रमांकावर आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रूग्ण संख्येतही वाढत आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ दिवस वाढवावी, अशी चर्चा मंत्रीमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितली आहे. त्यानुसार ते लवकरच निर्णय जाहीर करतील. श्री. टोपे म्हणाले, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना तूर्त लसीकरण केले जाणार नाही. लसीचा तुटवडा असल्याने दुसरा डोस देऊ शकत नाही. कोविड शिल्डला दीड ते दोन महिन्यात तसेच कोवॅक्सिनला एक महिन्याच्या अंतरात दुसरा डोस देणे बंधनकारक आहे. अन्यथा त्याची प्रतिकारशक्ती निर्माण होणार नाही.

महाराष्ट्र शासनाने खरेदी केलेली लस ४५ वयोगटाच्यावरील व्यक्तींनाच दिली जाणार आहे. २० तारखेनंतर दीड कोटी डोस देऊ असे केंद्राने सांगितले आहे. लस मिळाल्यानंतर निर्णय घेता येईल. सध्यातरी प्राधान्यक्रम ४५ वयोगटातील लोकांना दुसरा डोस देण्यावरच असेल. राज्यात 20 लाख नागरिकांना दुसरा डोस देणे बाकी आहे अश्यात राज्य सरकारने लसीकरण केंद्रावर आता केवळ दुसरा डोस पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सध्या 16 लाख कोविशिल्ड तर चार लाख covacsin अशी 20 लाख लस बाकी आहे. सात लाख कोविशिल्ड तर चार लाख covacsin घेणाऱ्यांची संख्या बाकी आहे. हे लक्षात घेता सरकारने केवळ लसीकरण केंद्रांवर तूर्तास दुसऱ्या लस देण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिशन ऑक्सिजनचा निर्णय....

मंत्री मंडळाच्या बैठकीत मिशन ऑक्सिजनचा निर्णय झाला आहे, असे सांगून मंत्री टोपे म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याच्या गरजेइतका ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम करायला हवे. त्यानुसार एअर सेपरेशन युनिट, बीएसए युनिट या टेक्नॉलॉजीच्या आधारे ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांना नोंदणी, वीजबिल, स्टॅम्पड्युटी माफ केली जाणार आहे. तसेच जीएसटीमध्ये माफी दिली जाईल. महाराष्ट्रात ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्वाला आज मंत्री मंडळाच्या बैठकीत तत्वताः मान्यता दिली आहे. विविध मंत्र्यांनी काही सूचनाही केल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com