शालेय शुल्कात निम्मी सवलत द्या : नसीम खान यांची सरकारकडे मागणी

मागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्रशासन व संचालकांकडून लावला जात आहे.
Give half concession in school fees: Naseem Khan's demand to the government
Give half concession in school fees: Naseem Khan's demand to the government

मुंबई : कोरोना साथीमुळे मोठ्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कात निम्मी सवलत द्यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान Naseem Khan यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. इतके दिवस शालेय शुल्कात सवलत देण्याची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे तसेच शिक्षक संघटनांतर्फे केली जात होती. मात्र आता सत्तेतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनीच ही मागणी केल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikawad तसेच राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेते हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल, असे शिक्षक संघटना दाखवून देत आहेत. Give half concession in school fees: Naseem Khan's demand to the government

कोरोनाच्या फैलावात लोकांसमोर मोठे संकट उभे ठाकले असून अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे तसेच मध्यमवर्गही कठीण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यांना जगणेच कठीण झाले असताना शाळेची फी भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव टाकला जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बहुसंख्य पालकांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. याचा विचार करून शालेय शुल्क 50 टक्के कमी करून उर्वरित फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे म्हणतात की, मागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्रशासन व संचालकांकडून लावला जात आहे. पालकांची आर्थिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार नाही याचा विचार राज्य सरकारने करावा. ज्या शाळा जबरदस्तीने शालेय फी वसूल करतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे खान यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com