'मातोश्री'वरुन सूत्र हलली ; भाजपला दणका, दहा फुटीर नगरसेवकांवर टांगती तलवार

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढल्याने भाजपवासी झालेल्या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार येणार आहे.
Sarkarnaa Banner (45).jpg
Sarkarnaa Banner (45).jpg

माथेरान : राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे राजकीय वातावरण तापलं आहे.  माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही हाती 'कमळ' घेतले आहे. या नगरसेवकांवर कारवाई होणार का यावर महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे. political Matheran Shiv Sena will take action against ten corporators

माथेरान मधील सत्ताधारी शिवसेनेच्या गटातले मध्यंतरी  उपनगराध्यक्ष आठ नगरसेवक व एक स्विकृत सदस्य असे एकूण दहा नगरसेवक भाजपात गेल्याने अस्वस्थ असलेल्या शिवसेनेकडून जवळपास महिना होत असताना या बंडखोर नगरसेवकांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्यावतीने करण्यात आला आहे. 

पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढल्याने भाजपवासी झालेल्या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार येणार आहे.  मातोश्री वरून सर्व सूत्र हलविण्यात आले असून ही सर्व जबाबदारी शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी पार पाडली असल्याचं बोललं जात आहे.

माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा महिनाभरापूर्वी कोल्हापुरात पार पडला. या पक्षांतरामुळं माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी (उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती), राकेश चौधरी, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे.  

सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र का लिहिलं, राऊतांनी सांगितलं कारण 
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. या पत्राकरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेना नेते,  खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांचे स्थान संसदीय लोकशाही व्यवस्थेत सर्वोच्च आहे. महाराष्ट्र सरकारने पंतप्रधानांशी जुळवून घेतलेच आहे. मुळात ‘ वाकडे-तिकडे ‘काही नव्हतेच तर जुळवून घ्यायचा विषय येतोच कोठे?, असा सवाल करत तरीही ‘विनाकारण त्रास’ असा काही नाहक प्रकार सुरू असेल तर पंतप्रधान मोदी यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या विनाकारण त्रास प्रकरणावर दाद मागता येईल किंवा सरनाईकांचे पत्र जसेच्या तसे त्यांच्या माहितीसाठी पाठवता येईल, असं आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. 

 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com