कोरोना रोखण्यासाठी अजित पवार, डॉ. राजेश टोपे साताऱ्यात येणार - Deputy Chief Minister Ajit Pawar, Health Minister Dr. Rajesh Tope will come to Satara to review the corona infection | Politics Marathi News - Sarkarnama

कोरोना रोखण्यासाठी अजित पवार, डॉ. राजेश टोपे साताऱ्यात येणार

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 26 मे 2021

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते प्रशासन व आरोग्य विभागाला काही महत्वाच्या सूचना देखील करणार आहेत. तसेच सातारा मेडिकल कॉलेजच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची (Corona Pandemic) साखळी तुटेना झाली असून गेल्या २४ तासांत जिल्ह्यात पुन्हा २१५६ जण बाधित आढळले आहेत. तर ४० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाउन लागू करूनही आकडा कमी होत नसल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन तातडीने उपाय योजना करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar) व आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) येत्या शुक्रवारी (ता. २८) साताऱ्यात येत आहेत. ते जिल्ह्यातील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासकिय यंत्रणेला कोणता बुस्टर डोस देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  Deputy Chief Minister Ajit Pawar, Health Minister Dr. Rajesh Tope will come to Satara to review the corona infection

सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडू लागली आहे. प्रशासकिय पातळीवरून सुरू केलेले कडक लॉकडाउननंतरही आकडे कमी होत नाहीत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल २१५६ बाधित आढळले असून ४० जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर एकुण बाधितांचा आकडा दीड लाखांवर गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येऊन ती हतबल झाली आहे.

हेही वाचा : परमबीर सिंग म्हणाले होते, १० कोटी प्रदीप शर्मांकडे द्या; सोनू जालानचा गौप्य स्फोट..

तर कोरोना बाधितांवर गृहविलगीकरण कक्षात होणारे उपचार थांबवून आता संस्थात्मक विलगीकरणावर आरोग्य प्रशासनाने भर दिला आहे. त्यामुळे कोरोनाचा गावपातळीवर होणार प्रसार रोखता येणार आहे. एकुणच सातारा जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होऊ लागल्याने जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीच्या उपाय योजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे येत्या शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी साताऱ्यात येत आहेत.

आवश्य वाचा : पाकिस्तानने हल्ला केल्यास उत्तर प्रदेशला रणगाडे अन्‌ दिल्लीला शस्त्रसाठा खरेदी करायला लावणार का?

ते जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व माहिती घेणार आहेत. त्यानंतर ते प्रशासन व आरोग्य विभागाला काही महत्वाच्या सूचना देखील करणार आहेत. तसेच सातारा मेडिकल कॉलेजच्या कामाचाही आढावा ते घेणार आहेत. सध्या मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या सुविधांचे तपासणी होणार आहे. त्याच्या तयारीचा ही ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचीही कानउघडणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांच्या या दौऱ्याच्या तयारीसाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख