परमबीर सिंग म्हणाले होते, १० कोटी प्रदीप शर्मांकडे द्या; सोनू जालानचा गौप्य स्फोट..

खोट्या प्रकरणात आमच्यावर कसे गुन्हे दाखल केले, याची सर्व माहिती पुराव्यांसह सीआयडीला दिली आहे. परमबीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यावरही गुन्हे दाखल होतील, असे आता वाटत आहे. तेलगी घोटाळ्यापेक्षाही हा मोठा घोटाळा निघू शकतो.
Parambir Sing
Parambir Sing

नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख Former Home Minister Anil Deshmukh यांच्या गंभीर आरोप केलेले परमबीर सिंग Parambir Sing यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. कारण ‘अटक टाळायची असेल तर, प्रदीप शर्मांकडे १० कोटी रुपये द्या, Give Rs 10 crore to Pradeep Sharma असे परमबीर सिंग म्हणाले होते.’, असा गौप्यस्फोट सीआयडीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सोनू जालानने केला आहे. Sonu Jalan has done so in her reply to CID officials

पोलिस अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून सिंग पैशांची मागणी करीत होते. २०१७ मध्ये पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा हे स्वतःला एनकाऊंटर स्पेशालिस्ट समजत होते. त्यावेळी त्यांनी ॲन्टी एक्स्टॉर्शन सेलचे महत्वाचे पद देण्यात आले. पोलिस खात्यात हे अतिशय महत्वाचे पद आहे. या सेलचे अधिकारी संशयितांची चौकशी करतात, त्यांना अटक करतात आणि हे पद शर्मा सारख्या अधिकाऱ्याला दिल्यामुळे यामध्ये निश्‍चित आर्थिक व्यवहार झाला असावा, अशी शंका संबंधितांना आली होती, असे सोनू जालान यांना एका वृत्तवाहिनीला सांगितले. 

परमबीर सिंग आयुक्त असताना त्यांनी सचिन वाझेला खूप वर्षांनंतरही खात्यात घेतले आणि विशेष सवलती दिल्या होत्या आणि अनेक ठिकाणांहून वसुली करण्याचे काम त्याच्यावर सोपवले होते, हे एव्हाना उघड झाले आहे. परमबीर सिंग ठाण्यामध्ये आयुक्त असताना बऱ्याच व्यावसायिकांना ते बोलवायचे आणि स्वतःसाठी व त्यांच्या सहकाऱ्यांसाठी ते पैशांची वसुली करायचे. कुणालातरी एखाद्या प्रकरणात अडकवायचे आणि त्यांच्या मोबाइल फोनमध्ये ज्या लोकांची नावे असत, त्यांनाही पैशांसाठी धमकावायचे आणि वसुली करायचे. 

२०१७ मध्ये प्रदीप शर्मा यांनी माझ्या विरोधातही एक गुन्हा दाखल केला होता. तुला या गुन्ह्यात चांगलाच अडकवेन, असे म्हणत ५० लाख रुपयांची मागणी केली. मलासुद्धा फालतुच्या भानगडींत पडायचे नव्हते म्हणून मी सेटलमेंट करीत ४५ लाख रुपये त्याला दिले. 
त्याच प्रकरणात मी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला होता. पण तो अर्ज त्याने मला परत घ्यायला लावला. मला सांगितले की तू दिलेले पैसे वरपर्यंत गेलेले आहेत आता तुला कुणीही अटक करणार नाही. तुला घाबरायचे कारण नाही आणि त्याने मला अटकही केली नाही. 

२०१८मध्ये प्रदीप शर्माने पुन्हा क्रिकेट बेटिंगचे प्रकरण माझ्यावर लादले. पुन्हा शर्मा व त्याचे सहकारी पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकू लागले. तो ॲन्टी एक्स्टॉर्शन सेल नव्हताच, तर एक्स्टॉर्शन सेल होता. मला त्याच्या गाडीने त्याने थेट परमबीर सिंगकडे नेले. मी घाबरलो पाहिजे म्हणून मारहाणही केली. तेथे परमबीर सिंग यांनी १० कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे प्रदीप शर्माकडे द्यायला सांगितले. पण तो पूर्णतः खोटा गुन्हा होता. मी माझी बाजू सीआयडीकडे मांडली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होते, ते बघायचे आहे, असे सोनू जालान याने सांगितले. 

खोट्या प्रकरणात आमच्यावर कसे गुन्हे दाखल केले, याची सर्व माहिती पुराव्यांसह सीआयडीला दिली आहे. परमबीर सिंग यांच्यासह प्रदीप शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यावरही गुन्हे दाखल होतील, असे आता वाटत आहे. तेलगी घोटाळ्यापेक्षाही हा मोठा घोटाळा निघू शकतो, अशी परिस्थिती असल्याचे सोनू जालानने सांगितले. परमबीर सिंग यांची अटक टळली असली तरी नजीकच्या काळात ते मोठ्या अडचणीत सापडतील, असे बोलले जात आहे.  
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com