पाचशे मराठी पुस्तकांच्या पीडीएफ करणाऱ्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल...! 

या पीडीएफखोरांमुळे मराठी प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होत आहेच. परंतु अनेक पीडीएफ हया निकृष्ट स्वरूपाचे असल्याने वाचकांची ही फसवणूक केली जात आहे.
पाचशे मराठी पुस्तकांच्या पीडीएफ करणाऱ्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल...! 
Crime filed against gang who made PDF of 500 Marathi books ...!

सातारा : मराठीतील गाजलेल्या पाचशे पुस्तकांच्या बेकायदेशीर पीडीएफ तयार करून मराठी ग्रंथ व्यवसायाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळी विरुद्ध  कादंबरीकार विश्वास पाटील यांनी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. जुहू पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद करून रीतसर तपासाला सुरुवात केली आहे. याबाबत खुद्द प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी तक्रार दाखल करत त्याची माहिती फेसबुकवर दिली आहे. Crime filed against gang who made PDF of 500 Marathi books ...!

मराठीतील वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, पु. ल. देशपांडे, विश्वास पाटील, अब्दुल कलाम तसेच विश्वास नांगरे पाटील आदींच्या गाजलेल्या पुस्तकांचे पीडीएफ तयार करून ती फुकटात वितरित करणाऱ्या काही टोळ्या निर्माण झाले आहेत.

प्राथमिक पाहणीत हे गुन्हेगार राजस्थान, मुंबई, नागपूर व पुणे आदी ठिकाणाहून काम करतात. गैरकायदेशीर पीडीएफ तयार करणे, ते व्हाट्सअप ग्रुपवर बेकायदेशीररित्या वितरित करणे, तसेच पायरेटेड पुस्तके छापणे हा या टोळीचा उद्योग आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे याआधीच रीतसर तक्रार केलेली आहे.

 आता विश्वास पाटील यांनी कॉपीराईट ॲक्ट 1957 खाली केलेल्या तक्रारीवर जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे .या गुन्ह्यासाठी गुन्हेगारास सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे. आता तपास यंत्रणांनी हे पीडीएफ कोणकोणत्या व्हाट्सअप ग्रुपवर वितरित झाले. ते वितरित करण्यासाठी कोणत्या कोणत्या नंबरवरून गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य घडले याचा तपास सुरू केला आहे. काही ग्रुप हे परदेशातून असे गैरकृत्य करतात. परंतु त्या त्या देशातील भारतीय वकिलाती मार्फत त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन तयाना कायद्याच्या कचाट्यात आणले जाऊ शकते.

 या पीडीएफखोरांमुळे मराठी प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होत आहेच. परंतु अनेक पीडीएफ हया निकृष्ट स्वरूपाचे असल्याने वाचकांची ही फसवणूक केली जात आहे. विशेषतः रणजित देसाई, शिवाजी सावंत व विश्वास पाटील यांच्या इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांच्या सुद्धा काही महाभागांनी पीडीएफ केले आहेत. त्यातील बरेचसे धागेदोरे हाती लागत असून नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊ शकते .तरी सामान्य वाचकांनी या गैरकृत्य करणाऱ्या मंडळींकडूनपासून सावध राहावे ही विनंती.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in