सोमय्या, तुमचा मुलगा कुणाला पैसे मागतो? तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात?

तुमच्या नातेवाईकांच्या किती बोगस कंपन्या आहेत.
सोमय्या, तुमचा मुलगा कुणाला पैसे मागतो? तुमच्या घरचे कोणाकडून खंडणी वसूल करतात?
Nawab Malik gave answer to Kirit Somaiya's allegations

मुंबई  ः इतरांच्या मुलांकडे बोटं दाखवताना स्वतःची मुलं काय करतात, याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. तुमचा मुलगा कोणाला फोन करतो, कुणाकडे पैसे मागतो. घरातील लोक कोणाकडून खंडणी वसूल करण्याचे काम करत आहेत. तुमच्या नातेवाईकांच्या किती बोगस कंपन्या आहेत. ते कसे मनी लाँडरींग करतात, हे लोकांना माहीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. (Nawab Malik gave answer to Kirit Somaiya's allegations)

किरीट सोमय्या यांनी आज (ता. १३ सप्टेंबर) मुंबईत भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्याला मलिक यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. 

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बिनबुडाचे, राजकीय हेतूने आरोप करणे, किरीट सोमय्यांची ओळख आहे. मंत्र्यांना, सरकारला बदनाम करायचे कटकारस्थान रचले आहे. हे राजकीय हेतूने सरकारला बदनाम करण्यासाठी बोलतात. त्यांच्या आरोपात कोणतेही तथ्य नाही.

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारखान्यावर घरावर छापेमारी झाली होती. टॅक्स चुकवला, तर एजन्सीला कारवाई करण्याचा अधिकार आहे. इन्मक्स टॅक्स विभागाच्या वतीने छापेमारी केली. त्याला आता दोन वर्षे झालं आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. म्हणजे त्यांनी कोणताही गैरव्यवहार केला नाही, हे उघड आहे. किरीट सोमय्या यांना आता कोणी सिरियसली घेत नाही. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे उद्योग ते आता करत आहेत, असा आरोपही मलिक यांनी सोमय्यावर केला.

नवाब मलिक म्हणाले की, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार केल्याचा आरोप केले होते. मात्र, न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले. राजकीय हेतूने बिनबुडाचे आरोप करायचे. कटकारस्थान करायचे आणि त्यातून सरकारला बदनाम करायचे, हे आता उघड झाले आहे. काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांना कोणताही धोका नसताना त्यांना केंद्र सरकारने ४० पोलिसांची सुरक्षा दिली आहे. त्या माध्यमातून वेगळे वातावरण निर्माण करण्याचे काम भाजपच्या माध्यमातून होते आहे. सरकारमधील ११ लोकांवर सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे केले आहेत. मात्र, त्यात कोणतेही तथ्य नाही. सत्तेच्या जोरावर त्यांनी भुजबळांना अटक केली. मात्र, शेवटी सत्याचाच विजय झाला.

अगोदर नारायण राणे यांच्याकडे किरीट सोमय्या बोट दाखवत होते. त्यांनी खोका कंपन्या तयार केल्या. तसेच मनी लाँडरींग केले, असे आरोप करत होते. त्याबाबत आता सोमय्या का गप्प आहेत, असा सवालही नवाब मलिक यांनी केला. तसेच, अनिल देखमुख देशात आहेत, राज्यातच आहेत आणि आपल्या कुटुंबीयांबरोबर आहेत. त्यांच्याबाबत जे बोलतात, त्यांनी आपल्या पक्षाचा इतिहास पाहावा, असा टोला मलिक यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in